पीएनबीने एकूण ५,१३८ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवीचा निकाल ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत जाहीर झालेला असावा. वयोमर्यादेचा विचार करता, १ जानेवारी २०२६ रोजी उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे (उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९८ ते १ जानेवारी २००६ च्या दरम्यान झालेला असावा).
पीएनबी अप्रेंटिस निवड प्रक्रिया प्रामुख्याने ३ टप्प्यांत पार पडेल – १. ऑनलाइन लेखी परीक्षा: यामध्ये जनरल नॉलेज, इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र या विषयांवर प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा मार्च २०२६ च्या पहिल्या आठवड्यात नियोजित आहे. २. स्थानिक भाषा चाचणी: उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करत आहे, त्या राज्यातील स्थानिक भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. ही परिक्षा स्थानिक भाषेशी निगडीत असणार आहे. ३. कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी: अंतिम निवड गुणवत्ता यादी आणि शारीरिक पात्रतेवर आधारित असेल.
इच्छुक उमेदवारांनी प्रथम BFSI Sector Skill Council पोर्टलच्या ‘करिअर’ विभागाद्वारे किंवा PNB च्या अधिकृत वेबसाईट pnbindia.in वर नोंदणी करावी आणि त्यानंतर अर्ज भरून आपला फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
सामान्य/OBC/EWS (पुरुष): ९४४ रुपये.
सामान्य/OBC/EWS (महिला): ७०८ रुपये.
SC/ST/दिव्यांग/ट्रान्सजेंडर: २३६ रुपये.
अप्रेंटिसचा कालावधी १२ महिने (१ वर्ष) असेल. निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या पोस्टिंगनुसार मासिक विद्यावेतन दिले जाईल:
महानगरांसाठी: दरमहा १५,००० रुपये.
शहरी/निम-शहरी/ग्रामीण शाखांसाठी: दरमहा १२,३०० रुपये. याव्यतिरिक्त कोणताही इतर भत्ता दिला जाणार नाही.






