Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैद्यकीय शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्जन विभागाकडे पाठ! छोटीशी चूक पडते महागात म्हणून…

NEET-PG 2025 च्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांचा कल मेडिसिन व रेडिओलॉजीकडे वाढत असून फक्त 6.6% विद्यार्थ्यांनीच सर्जरीची निवड केल्याने तज्ज्ञ सर्जनांची कमतरता निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 30, 2025 | 05:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • भविष्यात हा ट्रेंड कायम राहिला तर चांगले सर्जन मिळणे कठीण
  • वैद्यकीय क्षेत्रात तज्ज्ञ सर्जनांची गरज
  • सर्वच पातळ्यांवर सकारात्मक बदल करण्याची गरज
वैद्यकीय शिक्षणात विद्यार्थ्यांची आवड झपाट्याने बदलू लागली असून याचा थेट परिणाम सर्जरी या शाखेवर जाणवत आहे. NEET-PG 2025 च्या पहिल्या समुपदेशन फेरीतील आकडेवारी पाहता, सर्वोच्च रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी शस्त्रक्रिया विषयापासून मोठ्या प्रमाणात दूर राहण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. यंदा टॉप 1,500 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 42 टक्के विद्यार्थ्यांनी MD जनरल मेडिसिनची निवड केली, तर 30 टक्के विद्यार्थ्यांनी MD रेडिओडायग्नोसिसला प्राधान्य दिले.

सर्व खासगी आणि डीम्ड विद्यापीठांचे देशव्यापी ऑडिट करण्याचे आदेश! कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह

याउलट, MS जनरल सर्जरी ही केवळ 6.6 टक्के म्हणजे फक्त ९९ विद्यार्थ्यांनी स्वीकारली. हे प्रमाण मागील काही वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक घट दर्शवणारे आहे आणि या परिस्थितीने वैद्यकीय क्षेत्रात चिंता वाढवली आहे. तज्ज्ञांच्या मते, शस्त्रक्रिया ही अत्यंत कौशल्य, अभ्यास, सराव आणि जबाबदारीची मागणी करणारी शाखा असल्याने विद्यार्थ्यांचा कल इतर सुरक्षित पर्यायांकडे वळत चालला आहे.

दीर्घकालीन प्रशिक्षण, सततची तणावपूर्ण परिस्थिती, रुग्णांकडून येणारा असंतोष, कोणतीही छोटीशी चूक महागात पडण्याची भीती, तसेच कायदेशीर खटल्यांचे वाढते प्रमाण हे घटक विद्यार्थ्यांना सर्जरीपासून दूर नेत आहेत. याउलट, रेडिओलॉजी ही शाखा अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडलेली असून कामाचे तास निश्चित, ताण कमी आणि जीवनशैली अधिक संतुलित असल्याने विद्यार्थी त्याला प्राधान्य देत आहेत. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रेडिओलॉजिस्टसाठी नेहमीच मोठी मागणी असते, तसेच या शाखेत वेगाने करिअर स्थिरता मिळते, हे देखील एक आकर्षण आहे. वरिष्ठ डॉक्टरदेखील आजच्या पिढीला रेडिओलॉजी किंवा मेडिसिनला प्राधान्य द्यावे असा सल्ला देताना दिसतात.

एम्सच्या सर्जरी विभागाचे तज्ज्ञ डॉ. नरेश कुमार यांनी स्पष्ट केले की दहा वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया ही सर्जनशीलता, कौशल्य आणि प्रतिष्ठेची शाखा मानली जात होती. मात्र आता परिस्थिती बदलली असून, भविष्यात हा ट्रेंड कायम राहिला तर चांगले सर्जन मिळणे कठीण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. रुग्णदेखील आज किरकोळ शस्त्रक्रियेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, तसेच अनेक वेळा गुंतागुंतीच्या प्रकरणात डॉक्टरांवरच दोष टाकला जातो. या सर्व घटकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढताना दिसते. परिणामतः शस्त्रक्रियेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या सातत्याने घटत आहे.

कॉम्प्रेहेन्सिव्ह मॉड्यूलर सर्व्हे एज्युकेशन २०२५ जाहीर! महाराष्ट्रातील प्रति विद्यार्थी सरासरी खर्च ‘इतका’

वैद्यकीय क्षेत्रात तज्ज्ञ सर्जनांची गरज मोठी असल्याने ही प्रवृत्ती भविष्यात गंभीर आव्हान निर्माण करू शकते. ऐनवेळी अनुभवी शल्यचिकित्सक उपलब्ध न राहण्याची शक्यता आरोग्यसेवेवरच ताण आणू शकते. त्यामुळे या शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी वैद्यकीय व्यवस्थेने प्रशिक्षण, कामाचे वातावरण आणि कायदेशीर सुरक्षा या सर्वच पातळ्यांवर सकारात्मक बदल करण्याची गरज आहे.

Web Title: Medical students turn to the surgical department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • Career
  • Medical

संबंधित बातम्या

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे
1

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात
2

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात

Cambridge survey : परदेशात शिक्षणाचे आकर्षण घटले? भारतातील विद्यार्थ्यांना देशातच UG शिक्षण घेण्याचा कल का वाढला?
3

Cambridge survey : परदेशात शिक्षणाचे आकर्षण घटले? भारतातील विद्यार्थ्यांना देशातच UG शिक्षण घेण्याचा कल का वाढला?

Best career options : इंजिनिअरिंग, एमबीए, लॉ आणि मेडिकल पैकी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या
4

Best career options : इंजिनिअरिंग, एमबीए, लॉ आणि मेडिकल पैकी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.