
शाळेपेक्षा घरचं शिक्षण प्रभावी! घरातील कामांमुळे वाढतो मुलांचा आयक्यू; पालकांनी वेळीच द्यायला हवी भर
Gen Z मध्ये वाढत चाललेले ‘रेज बुकिंग’ नक्की आहे तरी काय? एका क्लिकवर घेतात बर्नआऊटपासून सुट्टी
किचनमध्ये मदत
किचन म्हणजे फक्त स्वयंपाकघर नसून ती एक चालती-फिरती ‘मॅथ्स लॅब’ आहे. जेव्हा तुम्ही मुलांना चहामध्ये साखर घालायला, तांदूळ मोजायला किंवा भाज्या मोजायला सांगता, तेव्हा ते नकळत प्रमाण, मोजमाप आणि मोजणी शिकत असतात. अशा मोजण्याच्या आणि मिसळण्याच्या प्रक्रियेमुळे मुलांची ‘लॉजिकल रिझनिंग’ ची क्षमता विकसित होते.
लॉन्ड्री सॉर्टिंग
धुतलेल्या कपड्यांच्या ढिगातून मोज्यांची जोडी लावणे किंवा रंग आणि साइजप्रमाणे कपडे वेगळे करणे ही एक उत्तम मेंदूची कसरत आहे. ही मुलांचा आयक्यू
क्रिया मुलांची पॅटर्न ओळखण्याची आणि वर्गीकरणाची क्षमता वाढवते, जी गणित आणि कोडिंग शिकण्याचा पाया आहे.
बजेटिंग आणि खरेदी
जेव्हा तुम्ही बाजारात जाता किंवा ऑनलाइन सामान मागवता, तेव्हा मुलांना सोबत बसवा. त्यांना खरेदीची यादी तयार करू द्या आणि किंमतींची तुलना करायला सांगा. यामुळे मुलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आणि व्यवहार्य गणिताची समज विकसित होते. मर्यादित साधनांमध्ये योग्य निवड कशी करायची हे त्यांना कळते.
झाडांची काळजी घेणे
झाडांना पाणी देणे, माती तयार करणे आणि त्यांची वाढ पाहणे हे संयमाचे काम आहे. यामुळे मुलांची निरीक्षण क्षमता वाढते. निसर्गाशी जोडल्यामुळे तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते, ज्याचा थेट परिणाम आयक्यूवर होतो.
वस्तू दुरुस्त करणे
घरात एखादे जुने खेळणे तुटले असेल किंवा एखादे छोटे गॅजेट बिघडले असेल, तर मुलांना तुमच्यासोबत ते जोडायला किंवा दुरुस्त करायला लावा.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.