Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील सर्व शाळात आता ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’; मुलांसोबत दररोज 20 मिनिटे ‘हा’ उपक्रम राबविण्याचेही आवाहन

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासात मातांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 30, 2026 | 03:29 PM
राज्यातील सर्व शाळात आता ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’; मुलांसोबत दररोज 20 मिनिटे 'हा' उपक्रम राबविण्याचेही आवाहन

राज्यातील सर्व शाळात आता ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’; मुलांसोबत दररोज 20 मिनिटे 'हा' उपक्रम राबविण्याचेही आवाहन

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील शाळांना ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ घेण्याच्या सूचना
  • मेळाव्यानंतर ठरविलेल्या कृतींची शाळास्तरावर नोंद
  • मुलांसोबत रोज २० मिनिटे उपक्रम
पुणे/सोनाजी गाढवे : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासात मातांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे. हा उपक्रम केवळ औपचारिक पालक सभा न ठेवता माता-पालक आणि शिक्षक यांच्यात थेट संवाद घडवून आणणारा उपक्रम म्हणून राबविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि केंद्राच्या ‘निपुण भारत’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हा मेळावा वर्षातून चार वेळा घेण्यात येणार आहे. जुलै, ऑक्टोबर, जानेवारी आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या शनिवारी शाळास्तरावर मेळाव्याचे आयोजन केले जाईल. मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीवर आयोजनाची प्राथमिक जबाबदारी राहणार आहे.

मेळाव्यामध्ये पालकांच्या मातांना क्लिष्ट शासकीय भाषेत निमंत्रण न देता स्थानिक बोलीभाषेत वैयक्तिक फोन किंवा प्रत्यक्ष भेटीद्वारे सहभागी करून घेण्यावर भर देण्यात आला आहे. मेळाव्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, वाचन-लेखन, गणितीय कौशल्ये, घरातील अभ्यासाचे वातावरण, आरोग्य, पोषण, स्वच्छता, बालसुरक्षा आणि विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. ‘निपुण भारत’ अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाबाबत मातांना खेळ, कृती आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाईल.

मेळाव्यानंतर ठरविलेल्या कृतींची शाळास्तरावर नोंद

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या त्रुटी किंवा तक्रारींवर नकारात्मक चर्चा न करता सकारात्मक संवादावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मेळाव्यानंतर मातांची उपस्थिती, चर्चेतील मुद्दे, छायाचित्रे आणि ठरविलेल्या कृतींची शाळास्तरावर नोंद ठेवावी लागणार असून, आवश्यक बाबींचा समावेश शाळा विकास आराखड्यात करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा : तळेगावजवळ उभारणार नवीन MIDC! तब्बल 1100 एकर क्षेत्राचा प्रस्ताव; दरनिश्चितीनंतर…

मुलांसोबत रोज २० मिनिटे उपक्रम

माता-पालकांनी मुलांच्या अभ्यासाबाबत त्यांच्याशी संवाद साधावा. वाचन-लेखन, गोष्टींची पुस्तके, आरोग्यदायी सवयी तसेच आवडता-नावडता विषय याबाबत चर्चा करावी, यावर भर देण्यात आला आहे. ‘रोज २० मिनिटे मुलांसोबत’ असा उपक्रम राबविण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Mother parent educational gatherings will now be organized in all schools across the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • maharashtra
  • Students
  • Teachers

संबंधित बातम्या

Gondiya News: जि.प.ला मिळाले ४४५ शिक्षक! पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्यात मोठी नियुक्ती; १८५ शिक्षक दुसऱ्या टप्प्यात भरण्याची शक्य
1

Gondiya News: जि.प.ला मिळाले ४४५ शिक्षक! पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्यात मोठी नियुक्ती; १८५ शिक्षक दुसऱ्या टप्प्यात भरण्याची शक्य

Amravati News: चालकअभावी रुग्णाला पाठविले खासगी वाहनाने! ‘डफरीन’ प्रशासनाचा अजब कारभार; दोन रुग्णवाहिका आहे उपलब्ध
2

Amravati News: चालकअभावी रुग्णाला पाठविले खासगी वाहनाने! ‘डफरीन’ प्रशासनाचा अजब कारभार; दोन रुग्णवाहिका आहे उपलब्ध

Jaggery Price Hike: साखरेबरोबर गुळाचेही भाव वाढले: सणासुदीत सामान्यांना आर्थिक फटका पिशोरचा गावरान गुळ खातोय ‘भाव’ !
3

Jaggery Price Hike: साखरेबरोबर गुळाचेही भाव वाढले: सणासुदीत सामान्यांना आर्थिक फटका पिशोरचा गावरान गुळ खातोय ‘भाव’ !

Maharashtra Security Force: पालिकेत पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांचा ‘प्रवेश’; MSF चे 333 जवान हटवण्याच्या हालचाली
4

Maharashtra Security Force: पालिकेत पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांचा ‘प्रवेश’; MSF चे 333 जवान हटवण्याच्या हालचाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.