Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश! MPSC मध्ये पारदर्शकतेसाठी उच्चस्तरीय समिती गठित; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis MPSC news : MPSC परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 06, 2026 | 03:39 PM
mpsc

mpsc

Follow Us
Follow Us:

सिद्धेश प्रधान, मुंबई

Devendra Fadnavis MPSC news : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन परीक्षा पद्धतीसंदर्भात विविध मागण्या मांडल्या. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक आणि सुदृढ करण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत यूपीएससीचे माजी सदस्य, पोलीस महासंचालक, आयआयटीचे प्राध्यापक तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. समितीचा शासन आदेशही जारी करण्यात आला आहे.

ही समिती राज्यातील विविध विभागांमध्ये जाऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संबंधित घटकांशी थेट चर्चा करून त्यांच्या सूचना जाणून घेणार आहे. पुण्यातही समिती भेट देऊन स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी कठोर कारवाई

औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या गैरप्रकारात आयोगातील किंवा आयोगाबाहेरील कोणत्याही व्यक्तीचा सहभाग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना सरकार पाठीशी घालणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Pune Album Song: ‘पुण्याचा गणपती आहे सोन्याचा’! सात वर्षीय प्रणाली सुकाळेच्या गोड आवाजातील भक्तिगीत वेधले लक्ष

परीक्षा प्रक्रियेत आमूलाग्र सुधारणा करण्याचा प्रयत्न

स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टांना न्याय मिळावा, यासाठी परीक्षा व्यवस्थेत आवश्यक सुधारणा केल्या जात आहेत. प्रश्नपत्रिका निर्मितीपासून प्रत्यक्ष परीक्षा प्रक्रियेपर्यंत आवश्यक त्या सुधारणा सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन तातडीने लागू करण्यात येतील, असे फडणवीस यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कठोर कायदे आणि अधिक पारदर्शक परीक्षा पद्धती विकसित करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष

या भेटीवेळी शिक्षक सचिन ढवळे, यशवंत सोलाट, धनंजय मते, गणेश कड, उमेश कुदळे, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते निखिल पाटील यांच्यासह स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Mpsc exam reforms high level committee devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Arrested
  • CM Devedra Fadnavis
  • MPSC Exam

संबंधित बातम्या

पोलिस दलात खळबळ! ASI पी.एन.पाटील यांनी संपवलं आयुष्य; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय
1

पोलिस दलात खळबळ! ASI पी.एन.पाटील यांनी संपवलं आयुष्य; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीला कायमचा पूर्णविराम! ‘पीएमआरडीए’चा 2182 कोटींचा मास्टर प्लॅन
2

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीला कायमचा पूर्णविराम! ‘पीएमआरडीए’चा 2182 कोटींचा मास्टर प्लॅन

पेपरफुटीमुळे MPSC ला दणका! औषध निरीक्षक परीक्षा रद्द, तर कृषी सेवेच्या गुणदानावर विद्यार्थ्यांचे गंभीर आक्षेप
3

पेपरफुटीमुळे MPSC ला दणका! औषध निरीक्षक परीक्षा रद्द, तर कृषी सेवेच्या गुणदानावर विद्यार्थ्यांचे गंभीर आक्षेप

Supriya Sule : पुण्यातील ‘या’ भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल
4

Supriya Sule : पुण्यातील ‘या’ भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.