Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC : एमपीएससी परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल; ‘नवा पॅटर्न’ कुणाच्या पथ्यावर?

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ने परीक्षा पद्धतीत मोठा बदल करत वर्णनात्मक पद्धत लागू केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग च्या धर्तीवर झालेल्या या बदलामुळे विश्लेषण क्षमता आणि आकलनावर भर दिला जाणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 14, 2026 | 09:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

नीता परब, मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गेल्या काही काळात परीक्षा पद्धतीत केलेले महत्त्वपूर्ण बदल, विशेषतः वस्तुनिष्ठ पर्यायांकडून (एमसीक्यू) वर्णनात्मक (डिस्क्रीप्टिव्ह) स्वरूपाकडे झालेली वाटचाल, हा सध्या राज्यभरातील विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. युपीएससीच्या धर्तीवर करण्यात आलेल्या या बदलांमुळे राज्याच्या प्रशासकीय सेवेचे स्वरूप बदलणार असून, याचा फायदा आणि तोटा यावर आता िशक्षण िवभागात मंथन सुरू झाले आहे.

शिक्षकेतर कर्मचारी भरती लवकर करा! तातडीने भरती करण्याची मागणी

आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी आता ‘वर्णनात्मक पद्धत’ लागू केली आहे. यामध्ये उमेदवारांना केवळ पर्याय निवडायचे नसून, सविस्तर उत्तरे लिहायची आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या केवळ पाठांतराची नाही, तर त्यांच्या विश्लेषण क्षमतेची आणि वैचारिक स्पष्टतेची चाचणी होणार आहे.

या बदलांचा नेमका फायदा कुणाला?

या नवीन पद्धतीमुळे स्पर्धा परीक्षेचे समीकरण बदलले असून, खालील घटकांना याचा सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे.

लाभार्थी गट : फायद्याचे कारण

  • युपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी : एमपीएससी आणि यूपीएससीचा अभ्यासक्रम आता समान झाल्यामुळे एकाच तयारीमध्ये दोन्ही परीक्षा देणे सुलभ झाले आहे.
  • गंभीर आणि अभ्यासू उमेदवार: केवळ ‘नशिबाने’ किंवा ‘पाठांतराने’ उत्तरे बरोबर येण्याचे प्रमाण कमी होईल. सखोल ज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांची निवड होण्याची शक्यता वाढेल, असे िशक्षण तज्ञांचे मत अाहे.
  • चांगले लेखन कौशल्य असलेले विद्यार्थी : ज्यांचे मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे आणि जे विचार मांडण्यात प्रभावी आहेत, त्यांना वर्णनात्मक पेपरमध्ये चांगले गुण मिळतील.
  • प्रशासकीय दर्जा सुधारण्यास मदत : भविष्यात मिळणारे अधिकारी हे केवळ माहिती साठवणारे नसून, धोरणात्मक निर्णय घेण्याची क्षमता असलेले आणि विश्लेषण करणारे असतील.
बदलांमुळे निर्माण झालेली आव्हाने :

या बदलांमुळे िशक्षण क्षेत्रात चिंताही व्यक्त केल्या जात आहेत

  • ग्रामीण भागातील विद्यार्थी: ज्या विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शनाची आणि इंग्रजी/मराठी दर्जेदार साहित्याची कमतरता भासते, त्यांच्यासाठी वर्णनात्मक पेपर हे मोठे आव्हान ठरू शकतात.
  • कोचिंग क्लासचे वाढते महत्त्व: नव्या पॅटर्ननुसार उत्तरांच्या लेखनाचा सराव (ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस) करण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर कोचिंग क्लासेसकडे वळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक भार वाढू शकतो.
  • वेळेचे नियोजन: जुन्या पद्धतीत वेळ वाचवणे सोपे होते, मात्र आता ३ तासांत पूर्ण पेपर लिहिणे ही एक शारीरिक आणि मानसिक कसरत ठरणार आहे.

Roinet Solution Pvt Ltd ने केला Bank Sakhi चा विस्तार! दरमहा 50 हजार उत्पन्नाची संधी उपलब्ध

महाराष्ट्र प्रशासनासाठी स्वागतार्ह बदल

हा बदल महाराष्ट्र प्रशासनासाठी स्वागतार्ह आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उमेदवार अशाच पद्धतीने निवडला जातो. एखाद्या विषयावर सर्वांगीण विचार करुन चिकीत्सक पद्धतीने विचार करुन मुद्देसुद मांडणी करणे ही प्रशासनाची सुद्धा गरज आहे. भविष्यात अशा पद्धतीची परीक्षा पद्धत असेल तर प्रशासनास याचा फायदा होईल असे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे म्हणाले. एमपीएससीमधील हे बदल ‘गुणवत्तेला प्राधान्य’ देणारे आहेत. जरी हे बदल सुरुवातीला आव्हानात्मक वाटत असले, तरी लांब पल्ल्याचा विचार करता, महाराष्ट्राला अधिक सक्षम, विचारवंत आणि संवेदनशील अधिकारी मिळवून देण्यासाठी हा ‘नवा पॅटर्न’ मैलाचा दगद ठरेल यात शंका नाही, असे मत िशक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले अाहे.

Web Title: Mpsc radical changes in the mpsc examination pattern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • MPSC
  • MPSC Exam

संबंधित बातम्या

Judicial Services Exam : न्याय सेवा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेत बदल; वकिलीचा अनुभव ३ वरून किती वर्ष केला? जाणून घ्या
1

Judicial Services Exam : न्याय सेवा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेत बदल; वकिलीचा अनुभव ३ वरून किती वर्ष केला? जाणून घ्या

MPSC परीक्षेत पुन्हा गोंधळाचा आरोप; राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक परीक्षेचा ‘मार्किंग पॅटर्न’ फुटल्याचा दावा
2

MPSC परीक्षेत पुन्हा गोंधळाचा आरोप; राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक परीक्षेचा ‘मार्किंग पॅटर्न’ फुटल्याचा दावा

MPSC च्या पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई; थेट अवर सचिवालाच केली अटक
3

MPSC च्या पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई; थेट अवर सचिवालाच केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.