Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

10th Supplementary Result 2026: इयत्ता १० वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर! मुलींची बाजी, नागपूर विभाग राज्यात अव्वल

MSBSHSE SSC 10th Supplementary Result 2026: महाराष्ट्र राज्य मंडळाने इयत्ता १० वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. एकूण निकाल २९.५३ टक्के लागला असून विभागनिहाय आकडेवारी, एटीकेटी सवलत आणि गुणपडताळणी फी सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 14, 2026 | 04:30 PM
10

10

Follow Us
Follow Us:

MSBSHSE SSC 10th Supplementary Result 2026:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) पुरवणी परीक्षेचा निकाल आज (१४ जुलै) दुपारी १ वाजता जाहीर केला. यंदा राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या ५१,३१३ विद्यार्थ्यांपैकी १५,१५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकालाची टक्केवारी २९.५३ इतकी राहिली आहे.

यंदाच्या पुरवणी परीक्षेसाठी ५२,८८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५१,३१३ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये १०,२२४ मुले तर ४,९३३ मुली आहेत. मुलांचा निकाल २७.७५ टक्के, तर मुलींचा निकाल ३४.०६ टक्के लागला असून मुलींनी यंदाही आघाडी कायम राखली आहे.

निकालानुसार, एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या १८,४८२ विद्यार्थ्यांना एटीकेटी (ATKT) सवलतीद्वारे इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. यंदा खाजगी विद्यार्थ्यांनाही जून-जुलै पुरवणी परीक्षेसाठी नावनोंदणीची संधी देण्यात आली होती. यामुळे मुदतीत अर्ज भरता न आल्याने शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विभागनिहाय निकालात नागपूर अव्वल

विभागीय मंडळनिहाय निकालात नागपूर विभागाने ४९.४२ टक्के निकालासह प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ नाशिक (४१.४५ टक्के) आणि लातूर (३४.५५ टक्के) विभागांचा क्रमांक लागतो. तर कोकण विभागाचा निकाल सर्वात कमी १२.२६ टक्के राहिला आहे.

Sports Management Career: मैदानाबाहेर राहूनही क्रीडा जगतात नाव कमावायचयं; जाणून घ्या स्पोर्ट्स मॅनेजमेंट काय आहे?

गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज

विद्यार्थ्यांना १५ जुलै ते २४ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहेत.

गुणपडताळणी शुल्क: प्रति विषय रुपये ५०,

उत्तरपत्रिकेची छायाप्रत: प्रति विषय रुपये ४००,

पुनर्मूल्यांकन शुल्क: प्रति विषय रुपये ३००

Career Options After 10th: १० वी नंतर ‘हे’ ६ डिप्लोमा कोर्सेस निवडा; करिअरमध्ये मिळेल झटपट यश

माध्यमिक शालान्त दहावी पुरवणी परिक्षा निकाल

तपशील मुले मुली एकूण
नोंदणी झालेले ३७,९२४ १४,९५६ ५२,८८०
प्रविष्ट झालेले ३७,८३१ १४,४८२ ५१,३१३
उत्तीर्ण १०,२२४ ४,९३३ १५,१५७
उत्तीर्ण टक्केवारी २७.७५ ३४.०६ २९.५३

मागील दोन वर्षांच्या तुलनेत निकालात घट

वर्ष टक्केवारी
जुलै-ऑगस्ट (२०२४) ३६.७८
जुन-जुलै  (२०२५) ३६.४८
जुन-जुलै  (२०२६) २९.५३

Web Title: Msbshse ssc 10th supplementary result 2026 declared pass percentage atkt rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • 10th
  • education
  • Maharashtra ssc 10th Result Updates

संबंधित बातम्या

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या
1

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या

Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या
2

Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?
3

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..
4

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.