Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Night College Success : मुंबईच्या रात्र महाविद्यालयातील ७५७ विद्यार्थी झाले बारावी उत्तीर्ण; संघर्षाची ही यशोगाथा वाचली का?

Mumbai Night College HSC Result: मुंबईतील ३९ रात्र महाविद्यालयांमधील ७५७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून इतिहास रचला आहे. घरकाम आणि कारखान्यात काम करून मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाची संपूर्ण माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 06, 2026 | 11:15 AM
Mumbai Night College HSC Result

Mumbai Night College HSC Result

Follow Us
Follow Us:
  • यंदा बारावी परीक्षा ७५७ विद्यार्थ्यांनी केली उत्तीर्ण
  • रात्र महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण
  • प्रत्यक्ष परीक्षेला १,३१९ विद्यार्थ्यांची हजेरी
Mumbai Night College HSC Result: शिक्षण घेण्याची आवड अन् कष्टाची तयारी असेल तर कठीण ध्येय सहज साध्य करता येते, हे रात्र महाविद्यालयात शिकून बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ७५७ विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. शालेय शिक्षणाच्या वयात विविध कारणांनी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूरावलेल्या या विद्यार्थ्यांनी रात्र महाविद्यालयाच्या माध्यमातून यंदा बारावी परीक्षा उत्तीर्ण करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. या वर्षी मुंबई शहर व उपनगरांमधील ३९ रात्र महाविद्यालयांमधून सुमारे १,३१९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ७५७ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होण्यात यश मिळवले आहे.

रात्र महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्रशाळा आणि रात्र महाविद्यालयाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करतात. या शहरात सध्या १०८ रात्रशाळा तर ३९ रात्र कनिष्ठ महाविद्यालये सुरू आहेत. येथे शिकणारे विद्यार्थी हे वयाच्या विविध टप्प्यातील असून त्यापैकी अनेक जण दिवसभर काम करून संध्याकाळी जमेल त्या दिवशी रात्र महाविद्यालयांमध्ये हजेरी लावतात.

New Curriculum Framework: दुसरी, तिसरी, चौथीनंतर आता सहावीचाही अभ्यासक्रम बदलला; दादा भुसे यांनी काय दिली माहिती?

प्रत्यक्ष परीक्षेला १,३१९ विद्यार्थ्यांची हजेरी

या वर्षी अर्ज दाखल केलेल्या १,३८५ विद्यार्थ्यांपैकी १,३१९ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मासूम या संस्थेने शहरातील ८१ रात्रशाळा आणि रात्र महाविद्यालांमध्ये शिक्षक पुरवणे, इतर सोयी उपलब्ध करून देणे हे काम हाती घेतले आहे. या संस्थेच्या निकिता शिवचरण (७७.३३), सारिका जाधव(७३.८३) आणि अशोक पावसे(७१.३३) या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. या विद्यालयातील कोणी चहाची टपरी चालवते, तर कोणी कडधान्य विक्रीचा व्यवसाय करते, कोणी घर संभाळत तर कोणी कारखान्यात काम करत हे यश मिळवले आहे.

Viral Video :परीक्षा केंद्रात विद्यार्थिनींचा विनयभंग? पाकिस्तानातील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल!

सरकारचे अस्पष्ट धोरण

या ३९ रात्र महाविद्यालयांच्या निकालापैकी तब्बल १० रात्र महाविद्यालयांचा निकाल ७० टक्क्यांपेक्षा जास्त तर चार महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच यावेळी २५ महाविद्यालयांनी ५० टक्क्यांपेक्षा जास्त निकाल नोंदवला आहे. मुंबई सेंट्रलच्या मॉडर्न नाइट हायस्कूलचे मुख्याध्यापक निरंजन गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयासाठी सरकारचे ठोस धोरण नसल्याने या शाळांना अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे. येथे विषयाला शिक्षक न मिळणे, साहित्याचा अभाव, घटती विद्यार्थी संख्या अशा अनेक अडचणी येत आहेत.

Web Title: Mumbai night college hsc result 757 students pass success story masoom org

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • College
  • education

संबंधित बातम्या

Yogesh Soman Workshop: साहित्यात अनुभवांना असते अनन्यसाधारण महत्त्व; अभिनेते योगेश सोमण यांचे प्रतिपादन
1

Yogesh Soman Workshop: साहित्यात अनुभवांना असते अनन्यसाधारण महत्त्व; अभिनेते योगेश सोमण यांचे प्रतिपादन

ABVP Warning to DTE: विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष; अभाविपने तंत्रशिक्षण संचालनालयाला दिला ‘हा’ मोठा इशारा
2

ABVP Warning to DTE: विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष; अभाविपने तंत्रशिक्षण संचालनालयाला दिला ‘हा’ मोठा इशारा

Beed Inspirational Story: साडी नेसून धावली आणि जिंकली मॅरेथॉन; बीडच्या माऊलीचे सर्वत्र का होतयं कौतुक?
3

Beed Inspirational Story: साडी नेसून धावली आणि जिंकली मॅरेथॉन; बीडच्या माऊलीचे सर्वत्र का होतयं कौतुक?

CAT 2026 ची तयारी AI द्वारे कशी करावी? जाणून घ्या अभ्यासाच्या स्मार्ट ट्रिक्स!
4

CAT 2026 ची तयारी AI द्वारे कशी करावी? जाणून घ्या अभ्यासाच्या स्मार्ट ट्रिक्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.