फोटो सौजन्य सोशल मीडिया
सोमय्या महाविद्यालयातील अनुराग चौरसिया या विद्यार्थ्याची पाचव्या सत्राची प्रलंबित गुणपत्रिका तयार करून त्याला हस्तांतरित करण्यात आली. तसेच अन्य एका विद्यार्थ्याच्या पात्रता प्रकरणावर तात्काळ सुनावणी घेऊन निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्येक प्रकरणाची माहिती घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हा संवाद महत्त्वाचा ठरला.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमाला प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सूचना आणि अभिप्रायाच्या आधारे विद्यापीठाच्या सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि विद्यार्थीहितैषी करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाने सांगितले.






