Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : नवी मुंबईत होणार एज्युसिटी; आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहराच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल, ‘ही’ विद्यापीठे भारतात येणार

सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे उत्कृष्टता केंद्रा (सेंटर ऑफ एक्सलन्स) अंतर्गत, अंदाजे 100 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय एज्युसिटी प्रकल्प विकसित करण्यात येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 13, 2025 | 04:02 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत होणार एज्युसिटी; आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहराच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल, ‘ही’ विद्यापीठे भारतात येणार
Follow Us
Close
Follow Us:
  • नवी मुंबई होणार एज्युसिटी
  • आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहराच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल
  • नेमकं प्रकरण काय ?

नवी मुंबई /सिद्धेश प्रधान :सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे उत्कृष्टता केंद्रा (सेंटर ऑफ एक्सलन्स) अंतर्गत, अंदाजे 100 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय एज्युसिटी प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. एकात्मिक आरोग्यविषयक व शैक्षणिक सुविधा, आंतरराष्ट्रीय मानकांचे क्रीडा संकुल व कौशल्य केंद्र उभारण्याच्या प्रमुख उद्देशाने उत्कृष्टता केंद्र हा प्रकल्प सिडकोतर्फे विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पाद्वारे नवी मुंबई हे नजीकच्या काळात जागतिक शिक्षण केंद्र म्हणून उदयास येणार आहे. या प्रकल्पाकरिता जमीन विकसित करण्याच्या कामाला गती देण्यात आली असून निविदा प्रक्रिया सुरू आहे.

सरकारी नोकरीची संधी! २७०० पदांसाठी निघाली भरती, BOB मध्ये करा आजच अर्ज

आंतरराष्ट्रीय एज्युसिटी हा देशामध्ये शैक्षणिक क्रांती घडवणारा प्रकल्प असून याद्वारे देशातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी विद्यापीठे व नामांकित शिक्षणतज्ज्ञांकडून शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे ज्ञानी समाजाची निर्मिती, बहुसांस्कृतिक आदानप्रदान आणि संशोधन यांना चालना मिळणार आहे. नियोजित वेळेत एज्युसिटी प्रकल्प पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. आंतरराष्ट्रीय एज्युसिटी एक ऐतिहासिक उपक्रम असून ज्यामध्ये एकाच ठिकाणी एकाच कॅम्पसमध्ये १० हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठे सामील असतील – हा देशातील अशा प्रकारचा एकमेव उपक्रम ठरेल.” असा विश्वास सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, विजय सिंघल यांनी व्यक्त केला आहे.

पदवीधरांना अर्जाची संधी! वेतन ₹८५,९२० प्रतिमहिना, IPPB मध्ये ३०९ पदांसाठी भरती

‘ही’ विद्यापीठे येणार भारतात

14 जून 2025 रोजी सिडको, महाराष्ट्र शासन आणि यॉर्क विद्यापीठ, ॲबरडीन विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉइस इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी आणि आयईडी विद्यापीठ या पाच नामांकित परदेशी विद्यापीठांदरम्यान सामंजस्य करारनामा करण्यात येऊन नवी मुंबईमध्ये कॅम्पस स्थापन करण्याकरिता या विद्यापीठांना इरादापत्रे प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, सिडकोच्या एज्युसिटी उपक्रमांतर्गत नवी मुंबईमध्ये जागतिक दर्जाच्या विद्यापीठांचे कॅम्पस स्थापन करण्यात येणार आहेत.

उलवेतील कुंडेवहाळ येथे 100 हेक्टरवर पसरणार एज्युसिटी

उलवे येथील कुंडेवहाळ येथे सुमारे 100 हेक्टरवर एज्युसिटी विकसित करण्यात येत असून ती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ३-४ किमीच्या परिघात वसलेली आहे. या व्यतिरिक्त मल्टिमोडल कॉरिडॉर, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग यांद्वारे देखील कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. मुंबईहून वाहनाद्वारे एज्युसिटी एक तासाच्या अंतरावर असून एरोसिटी, नैना शहर, खारघर कार्पोरेट पार्क, गोल्फ कोर्स व पनवेल महानगरपालिका क्षेत्रापासूनही नजीकच्या अंतरावर आहे.

राष्ट्रीय महामार्गाची कनेक्टिव्हिटी लाभणार

एज्युसिटीकरिता देण्यात आलेली जमीनीच्या सपाटीकरणाचे काम आवश्यक असून जमिनींचे सुलभरीत्या वाटप करता यावे म्हणून चार स्वतंत्र भूखंडांवर भूविकासाचे काम करण्यात येणार आहे. सिडकोतर्फे भाग-1 व भाग-2 मधील 50 हेक्टर जमिनीच्या विकासासह 45 मी. x30 मी. रुंद प्रवेश मार्गाचे काम हाती घेण्यात आले असून ई-निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. ही कामे पूर्णत्वास गेल्यानंतर 45 मी. रुंद मार्गाद्वारे राष्ट्रीय महामार्ग 348 (राष्ट्रीय महामार्ग 4बी) जेएनपीटी वरून एज्युसिटी येथे थेट प्रवेश मिळणार आहे. त्याचप्रमाणे सिडको नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते पनवेल रेल्वे स्थानक जोडणारी मेट्रो लाईन एम-२४ ची योजना आखत आहे, जी नैना क्षेत्रापर्यंत विस्तारेल आणि प्रस्तावित एरोसिटी आणि एज्युसिटीला देखील जोडेल.नवी मुंबईला जागतिक शिक्षण केंद्र बनवण्याकरिता सिडकोची कटिबद्धता अधोरेखित करणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या भूविकासाची कामे व ई-निविदा प्रक्रिया यांना सुरुवात झाली असून देशाच्या शिक्षण क्षेत्रातील हा क्रांतिकारी प्रकल्प ठरणार आहे.

Web Title: Navi mumbai to become educity york university aberdeen university university of western australia to come to india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 02:46 PM

Topics:  

  • cidco news
  • education news
  • muncipal corporation
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल
1

Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं राहणार 350 खोल्यांचं रेडिसन कलेक्शन हॉटेल
2

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं राहणार 350 खोल्यांचं रेडिसन कलेक्शन हॉटेल

Navi Mumbai : विद्यामंदिर की मदिरामंदिर ? शाळेच्या भोवती तळीरामांची जंगी पार्टी; पोलिसांनी गस्त वाढविण्याची होतेय मागणी
3

Navi Mumbai : विद्यामंदिर की मदिरामंदिर ? शाळेच्या भोवती तळीरामांची जंगी पार्टी; पोलिसांनी गस्त वाढविण्याची होतेय मागणी

SSC CHSL Admit Card 2025 Link: एसएससी सीएचएसएल अ‍ॅडमिट कार्ड निर्गमित, असे करा डाऊनलोड; परीक्षा 12 नोव्हेंबरपासून
4

SSC CHSL Admit Card 2025 Link: एसएससी सीएचएसएल अ‍ॅडमिट कार्ड निर्गमित, असे करा डाऊनलोड; परीक्षा 12 नोव्हेंबरपासून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.