फोटो सौजन्य - Social Media
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) मार्फत देशभरातील पात्र उमेदवारांसाठी नवी रोजगारसंधी निर्माण झाली आहे. (Recruitment for Graduate) बँकेने असिस्टंट मॅनेजर (Scale I) आणि ज्युनियर असोसिएट (NA) या पदांसाठी मोठ्या प्रमाणावर म्हणजेच ३०९ जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ippbonline.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. एकूण पदांपैकी असिस्टंट मॅनेजरसाठी १९९ तर ज्युनियर असोसिएटसाठी ११० जागा उपलब्ध आहेत. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात, मात्र संबंधित क्षेत्रात ३ ते ५ वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे. उमेदवारांचे वय २० ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे. निवड प्रक्रिया मेरिट बेसिसवर होणार असून, अंतिम टप्प्यात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹८५,९२० इतके आकर्षक वेतन मिळेल.
अर्ज करताना उमेदवारांनी प्रथम ippbonline.com या साइटवर “Apply Online” लिंकवर क्लिक करावे, नंतर नवीन रजिस्ट्रेशन करून लॉगिन करावे. आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी आणि मागवलेली कागदपत्रे योग्य स्वरूपात अपलोड करून फॉर्म सबमिट करावा. शेवटी फॉर्मचा प्रिंटआउट काढून ठेवणे महत्त्वाचे आहे. ही भरती विशेषतः सरकारी नोकरी आणि बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी सुवर्णसंधी आहे. अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर उमेदवारांना या माध्यमातून स्थिर आणि उच्च वेतनाची नोकरी मिळू शकते. त्यामुळे इच्छुकांनी उशीर न करता त्वरित अर्ज प्रक्रिया पूर्ण करून आपल्या करिअरची दिशा बदलण्याची ही संधी साधावी.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक माहिती
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही भारतीय टपाल विभागाच्या मालकीची सरकारी बँक असून तिची स्थापना १ सप्टेंबर २०१८ रोजी करण्यात आली. या बँकेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणे. ग्रामीण भागात जिथे पारंपरिक बँका पोहोचू शकत नाहीत, तिथेही इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून डिजिटल व्यवहार, पैसे ट्रान्सफर, विमा, आणि बचत खाते अशा सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.
IPPB चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि सध्या देशभरातील हजारो पोस्ट ऑफिसेसमधून या बँकेच्या सेवा दिल्या जात आहेत. या बँकेची खासियत म्हणजे पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांच्या माध्यमातून नागरिकांच्या दारापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवणे. त्यामुळे आर्थिक समावेशनाला मोठी चालना मिळाली आहे.






