Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCERT Class 8 Book Updates: NCERT चा मोठा निर्णय! इयत्ता ८ वीच्या पाठ्यपुस्तकात केले ‘हे’ मोठे बदल

NCERT class 8 social science modified book 2026 : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (NCERT) सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर इयत्ता ८ वीच्या पुस्तकातून न्यायपालिकेतील भ्रष्टाचार आणि प्रलंबित खटल्यांशी संबंधित वादग्रस्त भाग हटवला असून नवीन सुधारित आवृत्ती प्रकाशित केली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 07, 2026 | 09:41 AM
ncert

ncert

Follow Us
Follow Us:

NCERT Class 8 Revised Textbook: नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (NCERT) इयत्ता ८ वीच्या सोशल सायन्सचे (सामाजिक शास्त्र) सुधारित पाठ्यपुस्तक जारी केले आहे. काही महिन्यांपूर्वी न्यायपालिकेशी संबंधित वादग्रस्त मजकुरामुळे हेच पुस्तक मागे घ्यावे लागले होते. आता नवीन आवृत्तीमध्ये (New Edition) न्यायपालिकेवर लिहिलेला संपूर्ण धडा नव्याने तयार करण्यात आला आहे. यामध्ये अनेक जुने भाग हटवण्यात आले असून त्यांच्या जागी सुप्रीम कोर्टाची भूमिका, जनहित याचिका (PIL), ट्रिब्युनल आणि पर्यायी वाद निवारण यांसारख्या नवीन विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर पुस्तक झाले पुन्हा तयार

वास्तविक, या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या इयत्ता ८ वीच्या सोशल सायन्सच्या पुस्तकातील न्यायपालिकेवरील काही मुद्द्यांवरून वाद निर्माण झाला होता. यानंतर सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दखल घेत या प्रकरणाची सुनावणी सुरू केली होती.

सुनावणीदरम्यान NCERT ने न्यायालयाची माफी मागितली आणि पुस्तकात काही चुकीचा मजकूर समाविष्ट झाला असल्याची कबुली दिली. यानंतर सुप्रीम कोर्टाने पुस्तकाच्या प्रिंट आणि डिजिटल दोन्ही आवृत्त्यांच्या वितरणावर बंदी घातली होती आणि संबंधित धडा पुन्हा लिहिण्याचे निर्देश दिले होते. आता त्याच आदेशानंतर हे सुधारित पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. नवीन पुस्तकात “समाजातील न्यायपालिकेची भूमिका” या शीर्षकाच्या धड्याला पूर्णपणे नवे रूप देण्यात आले आहे.

पूर्वी जिथे न्यायपालिकेसमोरील आव्हाने, खटले प्रलंबित राहणे आणि भ्रष्टाचार यांसारख्या मुद्द्यांचा उल्लेख होता, तो सर्व भाग आता हटवण्यात आला आहे. त्याऐवजी आता संविधानाच्या रक्षणात सुप्रीम कोर्टाची भूमिका, सामान्यांची न्यायापर्यंतची पोहोच, जनहित याचिका (PIL), ट्रिब्युनल आणि पर्यायी वाद निवारण यांसारख्या व्यवस्था सविस्तरपणे समजावून सांगण्यात आल्या आहेत.

स्वतंत्र न्यायपालिकेवरील जुनी चर्चाही वगळली

पूर्वीच्या पुस्तकात असे सांगण्यात आले होते कि, स्वतंत्र न्यायपालिका नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे सर्वात मजबूत संरक्षण करते आणि संविधान न्यायाधीशांना कार्यपालिका व विधिमंडळाच्या हस्तक्षेपापासून वाचवते. परंतु, नवीन पुस्तकातून हा संपूर्ण भागही हटवण्यात आला आहे.

Rain Alert: शाळांना रेड अलर्ट! मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; जिल्ह्यातील सर्व शाळांना तातडीने सुट्टी जाहीर!

याशिवाय, धड्याच्या सुरुवातीला दिले जाणारे मुख्य प्रश्न देखील बदलण्यात आले आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांना स्वतंत्र न्यायपालिका का आवश्यक आहे, असा प्रश्न विचारला जात असे; तर आता त्यांना न्याय एका सलोख्याच्या समाजासाठी का महत्त्वाचा आहे, असा प्रश्न विचारला जातो.

वाद झाल्यानंतर सरकारने केले मोठे बदल

या संपूर्ण वादानंतर शिक्षण मंत्रालयाने सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक देखरेख समिती (Monitoring Committee) स्थापन केली. यामध्ये माजी ॲटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल आणि हेमवती नंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश सिंग यांचाही समावेश करण्यात आला.

तसेच नॅशनल ज्युडिशियल अकॅडमीच्या प्रमुखांनाही न्यायपालिकेशी संबंधित शालेय अभ्यासक्रमाच्या पुनरावलोकन प्रक्रियेत जोडण्यात आले. दुसरीकडे, NCERT ने देखील आपले पाठ्यपुस्तक तयार करणाऱ्या समितीची पुनर्रचना केली आणि पुस्तकांची मान्यता, प्रकाशन व वितरण प्रक्रियेत बदल केले.

Railway Loco Pilot: रेल्वेत ‘लोको पायलट’ व्हायचंय? मग परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी ‘या’ मेडिकल टेस्टबद्दल लगेच जाणून घ्या

NEP 2020 अंतर्गत नवीन पुस्तकांचे प्रकाशन सुरू

NCERT राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF-SE २०२३) नुसार सातत्याने नवीन पुस्तके तयार करत आहे. आतापर्यंत इयत्ता १ ली ते ९ वीची नवीन पुस्तके जारी करण्यात आली आहेत. सुधारित इयत्ता ८ वीच्या या पुस्तकात सर्वात आधी दिसणारा बदल म्हणजे त्याचे नवीन मुखपृष्ठ (कव्हर) आहे. तर पुस्तकाच्या प्रस्तावनेत NCERT चे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी म्हटले आहे की, नवीन पुस्तक भारतीय सांस्कृतिक मूल्यांवर आधारित असून विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुरूप जागतिक दृष्टिकोनही प्रदान करते.

Web Title: Ncert class 8 social science revised textbook changes supreme court order

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • Book Release
  • education

संबंधित बातम्या

Mumbai University Update: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा देणार आहात का? हॉल तिकीट हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य
1

Mumbai University Update: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा देणार आहात का? हॉल तिकीट हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य

IIT Bombay : टेक प्रोफेशनल्ससाठी खूशखबर! IIT बॉम्बेकडून ‘हा’ नवीन डिप्लोमा कोर्स सुरू..
2

IIT Bombay : टेक प्रोफेशनल्ससाठी खूशखबर! IIT बॉम्बेकडून ‘हा’ नवीन डिप्लोमा कोर्स सुरू..

Lost Marksheet : १० वी-१२ वीची मार्कशीट हरवली? आता घाबरू नका, या सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच मिळवा
3

Lost Marksheet : १० वी-१२ वीची मार्कशीट हरवली? आता घाबरू नका, या सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच मिळवा

Reservation: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेशात मिळणार आरक्षण; पण किती टक्के? जाणून घ्या सविस्तर..
4

Reservation: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेशात मिळणार आरक्षण; पण किती टक्के? जाणून घ्या सविस्तर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.