Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCERT Curriculum Change: एनसीईआरटीचा मोठा बदल! ९ वीच्या विद्यार्थ्यांना आता शिकवली जाणार ‘१९७५ ची आणीबाणी!

NCERT Class 9 Social Science Syllabus Change 2026: एनसीईआरटीने (NCERT) इयत्ता ९ वीच्या सामाजिक शास्त्राच्या नवीन पुस्तकात १९७५ च्या आणीबाणीचा धडा समाविष्ट केला आहे. भारतीय लोकशाहीच्या या कालखंडाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यामागचा उद्देश येथे सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 25, 2026 | 09:34 AM
एनसीईआरटी

एनसीईआरटी

Follow Us
Follow Us:

NCERT Curriculum Change 2026 : देशातील शालेय अभ्यासक्रमात एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ने (NCERT) इयत्ता ९ वीसाठी सामाजिक शास्त्राचे नवीन पुस्तक जारी केले आहे. यामध्ये देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि संवेदनशील राजकीय घडामोडीला स्थान देण्यात आले आहे. या नवीन पुस्तकाचे नाव ‘Understanding Society: India and Beyond-Part 1’ असे आहे. याद्वारे देशात पहिल्यांदाच ९ वीच्या विद्यार्थ्यांना वर्ष १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीबद्दल सविस्तर शिकवले जाईल.

आतापर्यंत देशातील या सर्वात जास्त चर्चिल्या गेलेल्या राजकीय कालखंडाला प्रामुख्याने वरिष्ठ इयत्तांमध्ये किंवा उच्च शिक्षणाच्या (Higher Education) पातळीवरच शिकवले जात होते. परंतु, आता शालेय विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या टप्प्यावरच भारतीय राजकारणातील या महत्त्वपूर्ण वळणाची समज दिली जाईल. हा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाहीची ताकद, तिचे चढ-उतार आणि घटनात्मक अधिकारांचे महत्त्व याविषयीची ओळख करून देणे हा आहे.

भारतीय लोकशाहीचा सर्वात वादग्रस्त काळ

एनसीईआरटीच्या (NCERT) नवीन पुस्तकात वर्ष १९७५ चा कालखंड हा भारतीय लोकशाहीचा सर्वात वादग्रस्त आणि आव्हानात्मक काळ असल्याचे सांगितले आहे. या धड्यामध्ये विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले आहे की, आणीबाणी म्हणजे नेमके काय असते, ती का लागू केली जाते आणि भारतीय संविधानानुसार तिचे किती प्रकार आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना समजेल की, एका लोकशाही देशामध्ये नागरिकांचे मूलभूत अधिकार (Fundamental Rights) आणि न्यायपालिकेची (Judiciary) भूमिका किती मोठी असते. या पुस्तकात केवळ आणीबाणी लागू झाल्याची घटनाच नाही, तर त्यामागील संपूर्ण घटनाक्रम आणि पार्श्वभूमी देखील समाविष्ट करण्यात आली आहे.

CA Inter Topper Marksheet: सीए इंटरमीडिएट टॉपर शार्दुल विचारेची मार्कशीट पाहिलीत का? नसेल तर लगेच पहा..

२१ महिन्यांनंतर लोकशाही झाली पूर्ववत

धड्याच्या शेवटच्या भागात हा काळा कालखंड संपण्याची आणि लोकशाहीच्या पुनरागमनाची कथा नोंदवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आहे की, सुमारे २१ महिन्यांच्या प्रदीर्घ आणि कडक निर्बंधांनंतर अखेर जानेवारी १९७७ मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली. यानंतर मार्च १९७७ मध्ये अधिकृतपणे आणीबाणी संपवण्यात आली. हा घटनाक्रम वाचून विद्यार्थ्यांना समजेल की, भारतीय जनतेने कशा प्रकारे मतदानाच्या अधिकाराचा वापर करून लोकशाही पुन्हा प्रस्थापित केली होती.

CUET UG 2026: ‘सीयूईटी यूजी’ परीक्षेत देविना गहलोत देशात पहिली! तासनतास अभ्यास नव्हे, तर ‘हे’ आहे यशाचे रहस्य…

Web Title: Ncert class 9 new social science book 1975 emergency chapter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • education
  • Emergency Situations

संबंधित बातम्या

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
1

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
2

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
3

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!
4

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.