फोटो सौैजन्य - Social Media
मध्यप्रदेश महिला व बाल विकास विभागात (WCD MP) तब्बल १९,५०३ पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १९ जून २०२५ रोजी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, ही भरती अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस व इतर पदांसाठी राज्यभर विविध जिल्ह्यांमध्ये होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी २० जून २०२५ पासून https://chayan.mponline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाईल.
पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १ जानेवारी २०२५ रोजी १८ ते ३५ वर्षांदरम्यान असावे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवारांसाठी शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे, परंतु बहुतांश पदांसाठी किमान ८वी, १०वी किंवा १२वी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड मूल्यमापन यादी (Merit List) तयार करून करण्यात येणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी व वैद्यकीय तपासणी घेतली जाईल. या प्रक्रियेत कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाही, त्यामुळे निवड प्रक्रिया पारदर्शक राहणार आहे.
अर्ज कसा कराल?
1. अधिकृत वेबसाईट https://chayan.mponline.gov.in ला भेट द्या.
2. ‘WCD MP Recruitment 2025’ विभाग शोधा आणि त्यावर क्लिक करा.
3. आपले नाव, ईमेल आयडी व मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा.
4. आवश्यक माहिती भरून शैक्षणिक व ओळखपत्रे अपलोड करा.
5. आवश्यक असल्यास ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरा.
6. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट घ्या.
ही भरती राज्यातील अंगणवाडी व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि महिलांच्या व बालकांच्या कल्याणासाठी एक महत्त्वाची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचून वेळेत अर्ज करावा.