फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्ही दिल्ली मेट्रोसोबत काम करण्याची इच्छा बाळगत असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने कन्सल्टंट डॉक्टर (जनरल फिजिशियन) पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. संबंधित भरतीची अधिसूचना delhimetrorail.com या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण दोन पदांसाठी निवड केली जाणार आहे. यातील एक डॉक्टर अजरोंडा स्टाफ क्वार्टर्स (दिल्ली) येथे आणि दुसरा डॉक्टर मुंडका स्टाफ क्वार्टर्स येथे नियुक्त केला जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार 11 जुलै 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन माध्यमातून होणार आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी असणे आवश्यक आहे. ही पदवी MCI (मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया) ने मान्यताप्राप्त असावी. यासोबतच उमेदवाराचे दिल्ली मेडिकल कौन्सिल (DMC) मध्ये नोंदणी असणे बंधनकारक आहे. जनरल मेडिसिनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असलेले उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच, जे उमेदवार सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये (PSU) अनुभवासहित काम केलेले आहेत, त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जून 2025 रोजी 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवारांची निवड पर्सनल इंटरव्ह्यू च्या आधारे केली जाणार आहे. अर्जांची छाननी झाल्यानंतर निवडलेले उमेदवार ऑगस्ट 2025 च्या पहिल्या आठवड्यात मुलाखतीसाठी बोलावले जातील. पगाराचा तपशील पाहता, निवड झालेल्या डॉक्टरला प्रती तास ₹2300 इतके मानधन दिले जाईल. ही नियुक्ती कॉन्ट्रॅक्ट आधारावर असेल आणि प्रारंभिक कालावधी 3 वर्षांचा राहील. जर कामकाज समाधानकारक ठरले, तर हा कालावधी पुढील 3 वर्षांसाठी वाढवता येईल.
उमेदवारांना अर्जाचा फॉर्मट DMRC च्या अधिसूचनेतून डाउनलोड करावा लागेल आणि खालील पत्त्यावर पोस्टाने पाठवावा लागेल:
General Manager (HR/O&M), Delhi Metro Rail Corporation Limited, Metro Bhawan, Fire Brigade Lane, Barakhamba Road, New Delhi.
अधिक माहितीसाठी delhimetrorail.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.