फोटो सौजन्य - Social Media
मुंबईसह देशभरात नोकरीची शोध प्रक्रिया आता पारंपरिक पद्धतींपासून दूर जात AI आणि तंत्रज्ञानाकडे वळली आहे. LinkedIn च्या नव्या रिपोर्टनुसार, मुंबईतील तब्बल 83% रिक्रूटर्स भरतीसाठीचा 70% बजेट AI आणि टेक टूल्सवर खर्च करत आहेत. वेग, अचूकता आणि गुणवत्तेवर आधारित भरती ही आता प्राथमिकता बनली आहे. विशेष म्हणजे केवळ डिग्रीवर नव्हे, तर प्रॅक्टिकल आणि ट्रान्सफरेबल स्किल्स वर भर दिला जातो.
या अभ्यासासाठी देशभरातील 1300 हून अधिक HR तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली. यामध्ये 67% मुंबईतील भरतीकर्त्यांनी स्पष्ट केलं की, डिग्रीपेक्षा स्किल्स महत्त्वाच्या आहेत. अॅडेको इंडियाचे MD सुनिल चेमनकोटील सांगतात की, हायब्रिड प्रोफाइल्स आणि बदलत्या जबाबदाऱ्यांमुळे पारंपरिक CV पुरेसे नाहीत. त्यामुळे LinkedIn Recruiter 2024 सारख्या AI टूल्सद्वारे योग्य उमेदवार निवडणं सोपं झालं आहे.
IT आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात AI चा वाढता प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. IT क्षेत्रातील 69% कंपन्यांना आजही दर्जेदार उमेदवार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. स्थानिक टॅलेंटच्या कमतरतेमुळे 56% ग्लोबल कंपन्यांना प्रशिक्षण न देण्याचा अडथळा येतोय, तर 55% स्पर्धेचा ताण जाणवत आहे. आज 65% रिक्रूटर्स AI बेस्ड स्क्रिनिंग टूल्स वापरतात, तर 62% डेटा अॅनालिटिक्सच्या आधारे निर्णय घेतात.
LinkedIn Recruiter 2024 हे AI टूल जलद, अचूक आणि योग्य उमेदवारांशी संवाद साधण्यात मदत करतं. या टूलमधून पाठवले जाणारे मेसेजेस 44% प्रतिसाद दर मिळवतात, जे पारंपरिक तुलनेत 11% जास्त आहे. तसेच Hiring Assistant हे टूल स्क्रिनिंग आणि सोर्सिंगची कामं ऑटोमेट करतं. एकूणच, AI हे करिअरचं भविष्य ठरत असून डिग्रीपेक्षा कौशल्ये आणि डिजिटल ओळख अधिक महत्त्वाची बनली आहे. योग्य स्किल्स असतील, तर AI युगात संधीच संधी आहेत. AI चा वापर आता लोकांच्या नियुक्तीसाठी करण्यात येत आहे, हे ऐकण्यात नवल जरी वाटत असले तरी संशोधनात ते निदर्शनास आले आहे. तसेच येत्या दिवसांत अनेक क्षेत्रात AI चा भरपूर वापर करण्यात येणार आहे.