Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Re-Exam Result 2026 : तामिळनाडूतील १२ विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी, ३९० हून अधिक गुण

NEET Re-Exam Result 2026 : नीट युजी 2026 पुर्नपरीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांचे कौतुकाचा सोहळा पाहायला मिळत आहे. तामिळनाडूतील १२ विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी, ३९० हून अधिक गुण प्राप्त झाले आहे आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 17, 2026 | 01:32 PM
NEET UG 2026 Result Out (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

NEET UG 2026 Result Out (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

नीट युजी 2026 पुर्नपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर तामिळनाडूमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळावले आहे. यंदा राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत देशभरात आपली छाप सोडली आहे. विशेष म्हणजे, 12 विद्यार्थ्यांनी 690 पेक्षा जास्त गुण मिळवत अखिल भारतीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. त्यामुळे यंदाच्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत तामिळनाडू पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावर्षीत नीट परीक्षा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. पेपरफुटीच्या आरोपानंतर आधीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर जून महिन्यात पुन्हा परीक्षा घेण्यात आली. यासंपुर्ण प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढला होता. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकाल मिळवला आहे.

राज्यात सर्वाधिक यश मिळवण्यामध्ये व्यंकटपथी वेलायुथम व्ही.ए…
राज्यातील सर्वाधिक यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये व्यंकटपथी वेलायुथम व्ही.ए. यांचे नाव सर्वात पुढे आहे. त्यांनी जवळपास परिपूर्ण पर्सेंटाईल मिळवत देशातील पहिल्या काही विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले. त्यांच्या पाठोपाठ श्रीनिका व्ही., सुदार ए.एम., वनिषा सतीश, सबरी जी.एन., आर. जयकृष्ण, संविथा पी., नविथाना व्ही., निखिल शिवानंथन एस., जननी श्वेता डी.आर., रोहित मॅथ्यू रबिंद्रराजन ई. आणि जे. जयकृष्ण या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. या यादीत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याने विविध घटकांतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे.

कट-ऑफ गुणांमध्ये वाढ…
यंदाच्या निकालातील सर्वात मोठा बदल म्हणजे कट-ऑफ गुणांमध्ये झालेली वाढ. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रवेशासाठी आवश्यक गुण सुमारे ३० ते ३५ गुणांनी वाढल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यंदा मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उच्च गुण मिळवले. त्यामुळे सरकारी तसेच नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी यावेळी अधिक कडवी स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

NEET UG 2026 मध्ये पंजाबच्या आर्यनची देशभरात चमक; कठोर मेहनतीने गाठला अव्वल मान

विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयासाठी अधिक प्रयत्न…
करिअर मार्गदर्शन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ६५० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा अनेक पटींनी वाढली आहे. त्याचप्रमाणे ६०० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याने गुणवत्ता यादीत मोठे बदल दिसून येत आहेत. याचा थेट परिणाम प्रवेश प्रक्रियेवर होणार असून, चांगले गुण मिळूनही अनेक विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयासाठी अधिक प्रयत्न करावे लागू शकतात. तामिळनाडूसाठी मात्र एक दिलासादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने राज्यातील एमबीबीएसच्या जागांमध्ये यंदा मोठी वाढ केली आहे. नव्याने जवळपास ९५० जागा उपलब्ध झाल्यामुळे राज्यातील एकूण एमबीबीएस जागांची संख्या जवळपास १४ हजारांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिक संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

NEET UG 2026 Result Out : 11.21 लाख विद्यार्थी पास, स्कोरकार्ड डाउनलोडची सोपी पद्धत जाणून घ्या…

प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू…
वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचे आता लक्ष समुपदेशन प्रक्रियेकडे लागले आहे. अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले तरी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून पुढील सूचनांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. वेळेत अर्ज करणे आणि योग्य माहिती तपासणे हे प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाचे ठरणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नीट परीक्षेने स्पर्धेची तीव्रता स्पष्ट केली आहे. चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे गुणवत्ता यादी अधिक कठीण झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी घाई न करता समुपदेशनातील प्रत्येक टप्पा काळजीपूर्वक पूर्ण करणे गरजेचे आहे. एकंदरीत, तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या नीट निकालात उत्कृष्ट कामगिरी करत राज्याची प्रतिष्ठा उंचावली आहे. मात्र वाढलेला कट-ऑफ आणि तीव्र स्पर्धा पाहता वैद्यकीय प्रवेशाचा प्रवास यंदा अधिक आव्हानात्मक ठरणार आहे. तरीही वाढलेल्या एमबीबीएस जागांमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला नवी आशा मिळाली आहे.

Web Title: Neet re exam result 2026 12 tamil nadu students score above 390 marks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • NEET Exam
  • NEET UG Result
  • Tamil Nadu

संबंधित बातम्या

Supreme Court on Reservation: धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला जुन्या जातीच्या आधारावर आरक्षण नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
1

Supreme Court on Reservation: धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला जुन्या जातीच्या आधारावर आरक्षण नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Admission Scam: डोळे निरोगी, पाय धडधाकट; तरीही बनवले ‘दिव्यांग’ प्रमाणपत्र! दून मेडिकल कॉलेजमध्ये MBBS प्रवेशाचा मोठा बनाव उघड
2

Admission Scam: डोळे निरोगी, पाय धडधाकट; तरीही बनवले ‘दिव्यांग’ प्रमाणपत्र! दून मेडिकल कॉलेजमध्ये MBBS प्रवेशाचा मोठा बनाव उघड

आता NEET परीक्षेवरही लागू होणार वयोमर्यादेची अट! प्रयत्नांची संख्या निश्चित करण्याची संसदीय समितीची शिफारस
3

आता NEET परीक्षेवरही लागू होणार वयोमर्यादेची अट! प्रयत्नांची संख्या निश्चित करण्याची संसदीय समितीची शिफारस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.