Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MBBS Admission 2026: वैद्यकीय प्रवेशासाठी समुपदेशनाची तारीख ठरली! चॉईस लॉक करताना ‘या’ चुका टाळा

MBBS Admission 2026 Update: नीट युजी समुपदेशन ५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. चॉईस लॉक करताना कोणत्या ७ चुका टाळाव्या? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर......

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 02, 2026 | 03:35 PM
एमबीबीएस

एमबीबीएस

Follow Us
Follow Us:

MBBS Admission 2026 Schedule: ‘NEET UG 2026’ चा निकाल जाहीर झाल्यानंतर आता लाखो विद्यार्थी समुपदेशन प्रक्रियेची वाट पाहत होते. मेडिकल कौन्सिलिंग कमिटीने आता नीट युजी २०२६ समुपदेशनाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. पहिल्या फेरीसाठी ऑनलाईन नोंदणी ५ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार आहे, तर अर्जाची अंतिम तारीख १२ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.

या प्रक्रियेद्वारे देशभरातील सरकारी, खाजगी आणि डिम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये MBBS, BDS आणि B.Sc Nursing सारख्या जागांवर प्रवेश दिला जाईल. मात्र, समुपदेशनादरम्यान केलेली एक छोटीशी चूकही चांगला रँक असलेल्या उमेदवाराची MBBS ची जागा हिरावून घेऊ शकते. अशा वेळी, कॉलेजचा पर्याय (Choice Locking) निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे आज जाणून घेऊया.

NEET UG समुपदेशन म्हणजे काय?

मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवारांनी MCC किंवा संबंधित राज्याच्या समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होणे अनिवार्य आहे. सर्वोच्च न्यायालय आणि NMC च्या नियमांनुसार कोणतेही मेडिकल कॉलेज कोणत्याही विद्यार्थ्याला थेट प्रवेश देऊ शकत नाही.

समुपदेशनादरम्यान ऑनलाईन नोंदणी, फी जमा करणे, चॉईस फिलिंग, चॉईस लॉकिंग, सीट वाटप, कागदपत्रांची पडताळणी, कॉलेजमध्ये रिपोर्टिंग आणि गरज पडल्यास पुढील फेरीत अपग्रेडेशन अशी पूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागते. यासोबतच १२ वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयांत आवश्यक असलेले किमान गुणही पाहिले जातात. अमराठी/खुल्या वर्गासाठी ५० टक्के आणि SC, ST तसेच OBC वर्गासाठी ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

चॉईस लॉक करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या:

१. फक्त मोठ्या मेडिकल कॉलेजेसची निवड करू नका: अनेक विद्यार्थी फक्त मोठी आणि प्रसिद्ध मेडिकल कॉलेजेसच पर्यायांमध्ये भरतात. असे केल्याने सीट मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते. त्यामुळे तुमच्या रँकनुसार जिथे प्रवेश मिळण्याची शक्यता जास्त आहे, अशी कॉलेजेसही पर्यायांमध्ये समाविष्ट करा.

२. वेळेत चॉईस लॉक करा: पर्याय भरल्यानंतर ते ठरलेल्या वेळेत लॉक करणे अत्यंत आवश्यक आहे. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिल्यास सर्व्हर किंवा तांत्रिक अडचण येऊ शकते. त्यामुळे वेळेत आपले पर्याय लॉक करा.

३. कॉलेजची फी आणि बॉण्डची माहिती नक्की तपासा: कॉलेज निवडण्यापूर्वी त्याची वार्षिक फी, हॉस्टेल फी, सिक्युरिटी डिपॉझिट, बॉण्डचा कालावधी, बॉण्डचा दंड आणि स्टायपेंड याबद्दलची सर्व माहिती नक्की तपासून घ्या. नंतर या नियमांबद्दल त्रास होऊ शकतो.

Shehzad Poonawalla Resigns: भाजपकडून राजीनामा दिल्यानंतर शहजाद पूनावाला चर्चेत! नेमके किती शिकलेत माजी राष्ट्रीय प्रवक्ते?

४. प्रवर्गाशी संबंधित माहिती अचूक भरा: जर तुम्हाला EWS, SC, ST, OBC किंवा PwD प्रवर्गाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे वैध प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. चुकीची माहिती किंवा अमान्य प्रमाणपत्र आढळल्यास तुमचा दावा रद्द केला जाऊ शकतो.

५. सर्व कागदपत्रांमधील माहिती जुळवून पाहा: NEET स्कोरकार्ड, आधार कार्ड, १० वी-१२ वीची गुणपत्रिका आणि इतर कागदपत्रांमधील नाव, जन्मतारीख, लिंग आणि प्रवर्ग यांसारखी माहिती समान असली पाहिजे. कोणताही फॉर्म भरण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.

UPSC & SSC Exam Changes: स्पर्धा परीक्षांच्या प्रक्रियेत मोठे बदल! परीक्षा प्रणालीतील ‘या’ बदलामुळे गैरप्रकारांना बसणार आळा

६. रिपोर्टिंगला उशीर करू नका: सीट मिळाल्यानंतर ठरलेल्या वेळेत कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करणे गरजेचे आहे. जर उमेदवाराने वेळेत रिपोर्ट केले नाही, तर त्याची सीट रद्द होऊ शकते आणि पुढील प्रक्रियेवरही परिणाम होऊ शकतो.

७. सीट सोडण्यापूर्वी नियम समजून घ्या: जर एखाद्या उमेदवाराला सीट मिळाली पण त्याने नंतर ती सोडली, तर अनेक राज्यांमध्ये सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होणे, दंड आकारला जाणे किंवा पुढील फेऱ्यांवर बंदी यांसारखी कारवाई होऊ शकते. त्यामुळे सीट सोडण्यापूर्वी MCC आणि संबंधित राज्याचे नियम नक्की वाचून घ्या.

Web Title: Neet ug counseling 2026 schedule released choice locking rules mbbs admission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • College
  • education
  • NEET

संबंधित बातम्या

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत
1

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

देशात आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालय होणार, केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांची घोषणा; आरोग्यसेवा सक्षम होईल
2

देशात आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालय होणार, केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांची घोषणा; आरोग्यसेवा सक्षम होईल

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
3

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!
4

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.