Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Internet Ban in Exams: परीक्षांमध्ये पेपर लीक रोखण्यासाठी थेट इंटरनेटच बंद? भारतातच नव्हे तर ‘या’ देशांमध्येही आहेत कडक नियम!

Internet Ban in Exams: परीक्षेच्या काळात कॉपी आणि पेपर लीक रोखण्यासाठी भारतात 'टेलिग्राम'वर बंदी घातली गेल्यामुळे मोठी चर्चा सुरू आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की जगात असे अनेक देश आहेत, जिथे परीक्षा सुरू असताना फेसबुक, व्हॉट्सॲप तर सोडाच, पण थेट संपूर्ण इंटरनेटच बंद करून टाकलं जातं.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 17, 2026 | 10:09 AM
internet

internet

Follow Us
Follow Us:

Exam Internet Ban:२१ जून २०२६ रोजी होणाऱ्या नीट-युजी (NEET-UG) पुनरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २२ जूनपर्यंत टेलिग्राम (Telegram) ॲपवर लावलेली तात्पुरती बंदी सध्या जोरदार चर्चेत आहे. परीक्षेच्या संदर्भातील खोट्या अफवा आणि गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय, टेलिग्रामला ३० जून २०२६ पर्यंत त्यांचे ‘मैसेज एडिट फीचर’ (Message Edit Feature) देखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून आधीच पाठवलेले संदेश एडिट करून संभ्रम पसरवता येणार नाही.

परंतु, परीक्षेदरम्यान एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा इंटरनेटवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. जगातील अनेक देशांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या परीक्षांच्या काळात सोशल मीडिया आणि थेट इंटरनेटच बंद करण्याची पद्धत बऱ्याच काळापासून सुरू आहे.

‘या’ देशांमध्ये परीक्षा काळात इंटरनेट केले जाते पूर्णपणे बंद

अल्जीरिया: परीक्षेदरम्यान सोशल मीडिया आणि इंटरनेटवर बंदी घालणाऱ्या देशांमध्ये अल्जीरिया आघाडीवर आहे. येथील सर्वात मोठी आणि महत्त्वाची नली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील ‘बॅकलॉरिएट’ (Baccalaureate) परीक्षा सुरू असताना देशभरात इंटरनेट आणि फेसबुक, व्हॉट्सॲप यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तात्पुरते बंद केले जातात. प्रश्नपत्रिका लीक होणे आणि कॉपीच्या घटना रोखणे हा यामागचा सरकारचा उद्देश असतो.

मॉरिटानिया: या आफ्रिकन देशामध्येही राष्ट्रीय परीक्षांच्या काळात कोणतीही हाय-टेक कॉपी किंवा गैरप्रकार होऊ नये म्हणून मोबाईल इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प केली जाते.

सूडान: सूडानमध्येही हाच पॅटर्न पाहायला मिळतो. परीक्षेच्या वेळेत विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ नये आणि पारदर्शकता टिकून राहावी यासाठी इंटरनेट सेवांवर तात्पुरती बंदी घातली जाते.

Telegram Ban: नीट परीक्षेसाठी आयटी मंत्रालयाने घेतलेल्या ‘या’ मोठ्या निर्णयावर Telegram Ceo संतापले!

भारतातही यापूर्वी उचलली गेली आहेत अशी पावले

२१ जून २०२६ च्या नीट परीक्षेसाठी टेलिग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय जरी मोठा असला, तरी भारतात याआधीही स्थानिक आणि राज्य स्तरावर इंटरनेट सेवा मर्यादित करण्यात आल्या आहेत.

राजस्थान, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर यांसारख्या राज्यांमध्ये अत्यंत संवेदनशील आणि मोठ्या सरकारी भरती परीक्षांच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि पेपर लीक रोखण्यासाठी अनेकदा ‘मोबाईल इंटरनेट’ (Mobile Internet) काही तासांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

IIT Bombay मध्ये CSE साठी फक्त ६५ रँकर्सनाच प्रवेश? कॉम्प्युटर सायन्सनंतर ‘या’ ब्रँचची आहे सर्वाधिक क्रेझ!

पेपर लीक रोखण्यासाठी इंटरनेट बंदी हाच अंतिम उपाय आहे का?

सायबर सुरक्षा आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, इंटरनेट किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्याने तात्पुरता आराम मिळू शकतो, परंतु हा पेपर लीक किंवा कॉपीसारख्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा (Permanent Solution) नाही.

आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडिया बंद करण्यापेक्षा परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करणे हेच भविष्यातील सर्वात प्रभावी पाऊल ठरेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Neet ug exam internet ban algeria sudan rajasthan marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • Exam
  • internet
  • Internet banking
  • NEET Exam
  • rajastan

संबंधित बातम्या

महत्त्वाची अपडेट! NEET PG 2026 परीक्षेची थेट फायनल आन्सर की येणार; निकालासाठी ‘या’ अधिकृत वेबसाइटवर ठेवा नजर
1

महत्त्वाची अपडेट! NEET PG 2026 परीक्षेची थेट फायनल आन्सर की येणार; निकालासाठी ‘या’ अधिकृत वेबसाइटवर ठेवा नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.