Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG Re-Exam 2026: २१ जूनचा पेपर ठरला प्रचंड कठीण! फिजिक्स आणि केमिस्ट्रीने वाढवला ताण; तज्ज्ञांनी वर्तवला नवा अंदाज

NEET UG Re-Exam 2026: २१ जून रोजी झालेल्या नीट यूजी फेरपरीक्षेचे सविस्तर विश्लेषण. फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या काठिण्यपातळीमुळे ऑल इंडिया कोटाचा कट-ऑफ घसरण्याची दाट शक्यता.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 22, 2026 | 01:17 PM
RE NEET

RE NEET

Follow Us
Follow Us:

NEET UG Re-Exam 2026: २१ जून २०२६ रोजी नीट यूजीची फेरपरीक्षा पार पडली. ५ हजारांहून अधिक केंद्रांवर २० लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी ही परीक्षा दिली. मात्र, यंदाच्या फेरपरीक्षेने विद्यार्थ्यांचा संयम, वेग आणि संकल्पनांच्या (कॉन्सेप्ट्स) खोलीची परीक्षा घेतली.

‘आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड’ (AESL) चे नॅशनल अकॅडमिक डायरेक्टर (मेडिकल) नबीन कार्की यांच्या मते, नीट यूजीच्या या फेरपरीक्षेने स्पर्धेचा नूरच बदलून टाकला आहे. या पेपरचा समावेश ‘मध्यम ते कठीण’ श्रेणीत केला जाईल. पेपरमध्ये पाठांतरापेक्षा विश्लेषण आणि आकडेमोडीवर जास्त भर देण्यात आला होता. या बदलाचा थेट परिणाम नीट यूजीच्या निकालावर होणार आहे. अवघड प्रश्नांमुळे ऑल इंडिया कोटाचा कट-ऑफ पूर्वीच्या अंदाजापेक्षा बराच खाली घसरू शकतो, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

Re-NEET 2026 Analysis: ३ मे च्या तुलनेत यंदाचा प्रवास ठरला अधिक कठीण

नबीन कार्की (AESL) यांच्या विश्लेषणानुसार, २१ जून रोजी झालेला री-नीटचा पेपर ३ मे रोजी झालेल्या पहिल्या सत्राच्या तुलनेत खूपच कठीण होता. आधीचा पेपर सरळ आणि सोपा होता, तर या पेपरने विद्यार्थ्यांच्या संकल्पनांचा सखोल वेध घेतला.

NEET UG 2026: ‘टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये मोबाईल!’ नीट परीक्षेत विद्यार्थ्याची अजब शक्कल; पोलिसांनी रंगेहात पकडले

भौतिकशास्त्र (Physics): संपूर्ण पेपरमध्ये फिजिक्सचा भाग सर्वात कठीण आणि वेळखाऊ ठरला. हा पेपर मेकॅनिक्स, इलेक्ट्रोडायनामिक्स, मॉडर्न फिजिक्स आणि थर्मोडायनामिक्स यांसारख्या मुख्य विषयांभोवती फिरत राहिला. ॲप्लिकेशन-बेस्ड आणि मोठ्या न्यूमेरिकल प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांवर वेळेचा प्रचंड ताण आला, ज्यामुळे अनेक मुलांना हा विभाग वेळेत पूर्ण करता आला नाही.

रसायनशास्त्र (Chemistry): केमिस्ट्रीचा विभाग देखील खूप वेगळा आणि कठीण होता. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये एकापेक्षा जास्त संकल्पना एकत्र करून विचारलेले प्रश्न आणि लांबलचक आकडेमोड होती. दुसरीकडे, ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये थेट प्रश्न विचारण्याऐवजी ‘रिएक्शन मेकॅनिझम’च्या सखोल ज्ञानाची चाचणी घेण्यात आली.

जीवशास्त्र (Biology): 

बायोलॉजीचा विभाग नेहमीप्रमाणेच विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा आधार आणि सर्वाधिक स्कोअरिंग झोन ठरला. हा पेपर मुख्यत्वे एनसीईआरटीच्या (NCERT) अभ्यासक्रमावर आधारित होता. यामध्ये जेनेटिक्स, फिजिओलॉजी, रिप्रोडक्शन आणि इकॉलॉजी यांसारख्या धड्यांचे वर्चस्व राहिले. मात्र, जूलॉजीमधील काही प्रश्नांचे पर्याय खूप फिरवून विचारलेले असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

Indian Navy Recruitment 2026: भारतीय नौदलात बंपर भरती! १० वी आणि डिप्लोमा उत्तीर्ण असणाऱ्यांना सुवर्णसंधी!

नीट यूजी एक्सपेक्टेड कट-ऑफ

सरकारी मेडिकल कॉलेजमधील जागांसाठी ऑल इंडिया कोटा अंतर्गत जनरल कॅटेगरीचा कट-ऑफ यंदा खाली घसरून ५९० ते ६०० गुणांच्या दरम्यान स्थिरावू शकतो, असा अंदाज तज्ज्ञ नबीन कार्की यांनी वर्तवला आहे. त्यामुळे ही नीट परीक्षा तेच विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकतात जे पाठांतरावर अवलंबून नाहीत तर ज्यांच्या संकल्पना स्पष्ट आहेत.

Web Title: Neet ug re exam paper analysis difficulty level cutoff

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Exam
  • NEET

संबंधित बातम्या

एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; CAT 2026 ची अर्ज प्रक्रिया आज संपणार!
1

एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; CAT 2026 ची अर्ज प्रक्रिया आज संपणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.