Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NSG Commandos Salary: देशातील सर्वात धोकादायक ‘NSG’ कमांडोची निवड कशी होते? वाचा त्यांच्या पगार आणि निवृत्तीनंतरचे फायदे

NSG Commandos Salary 2026 : देशातील सर्वात सुरक्षित आणि खतरनाक फोर्स मानल्या जाणाऱ्या नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कमांडोचा पगार, विशेष भत्ते आणि निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनचा सविस्तर तपशील येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 30, 2026 | 01:51 PM
comando

comando

Follow Us
Follow Us:

NSG Commandos Salary 2026 : देशातील सर्वात धोकादायक आणि सुरक्षित दलामध्ये एनएसजी म्हणजेच ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’चे नाव समोर येते, ज्यांना बहुतांश लोक ‘ब्लॅक कॅट कमांडो’ म्हणून ओळखतात. या दलाची स्थापना १९८४ मध्ये झाली असून, दहशतवाद्यांचा बिमोड करणे आणि विमान हायजॅकिंगसारख्या गंभीर संकटांचा सामना करणे हे या दलाचे मुख्य काम असते.

अनेक लोकांना असे वाटते की, इतर दलांप्रमाणेच एनएसजी कमांडोची भरतीही थेट होत असेल. परंतु, वास्तविकता तशी नाही. एनएसजीमध्ये थेट भरती होत नाही; तर भारतीय लष्कर (Indian Army) आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) म्हणजेच सीआरपीएफ (CRPF), बीएसएफ (BSF) आणि सीआयएसएफ (CISF) यांसारख्या दलांमधून जवानांची निवड केली जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की या कमांडोना पगार आणि निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन किती असते. चला तर मग जाणून घेऊया.

एनएसजी कमांडोला किती पगार मिळतो?

एनएसजी कमांडोचा पगार हा त्यांचे पद, कामाचा अनुभव आणि ते मूळ कोणत्या दलातून आले आहेत, यावर अवलंबून असतो. साधारणपणे एनएसजी कमांडोचा मासिक पगार ८० हजार रुपयांपासून ते ३ लाख रुपयांपर्यंत असू शकतो.

ट्रेनिंग कालावधी: ट्रेनिंग दरम्यान जवानांना १८ हजार ते ४० हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळतो.

RRB Technician Recruitment 2026: रेल्वेत टेक्निशियन पदांसाठी बंपर भरती; आजपासून अर्ज सुरू, जाणून घ्या पात्रता

भत्ते: ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मूळ पगारासोबतच अनेक प्रकारचे भत्ते मिळतात. यामध्ये ‘स्पेशल फोर्स अलाउन्स’ म्हणून २५ ते ३० हजार रुपये, ‘रिस्क अँड हार्डशिप अलाउन्स’ म्हणून २५ ते ४० हजार रुपये आणि ‘डेप्युटेशन अलाउन्स’ म्हणून ५ ते १० हजार रुपये मिळतात.

इतर सुविधा: पगाराव्यतिरिक्त कमांडोज्ना मोफत वैद्यकीय सुविधा, सरकारी निवासस्थान आणि लष्करी कॅन्टीनची सुविधा देखील मिळते.

या दलामध्ये पदांनुसार पगार वाढत जातो. कॉन्स्टेबल किंवा शिपाई या सुरुवातीच्या पदापासून हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट सब-इन्स्पेक्टर, सब-इन्स्पेक्टर आणि इन्स्पेक्टरपर्यंत बढती मिळते. त्यानंतर असिस्टंट कमांडंट, डेप्युटी कमांडंट आणि कमांडंट अशी मोठी पदे येतात. सर्वात उच्च पद ‘डायरेक्टर जनरल’ (महासंचालक) हे असते, ज्यांचा मासिक पगार सुमारे २ ते ३ लाख रुपये किंवा त्याहून अधिक असतो.

निवृत्तीनंतर एनएसजी कमांडोला किती पेन्शन मिळते?

निवृत्तीनंतर एनएसजी कमांडोज्ना सरकारी नियमांनुसार पेन्शन आणि इतर फायदे दिले जातात. एनएसजी कमांडो हे मूळचे त्यांच्या पॅरेंट फोर्सचे (आर्मी किंवा सीएपीएफ) कर्मचारी असल्याने, त्यांची पेन्शन देखील मूळ दलाच्या नियमांनुसारच निश्चित केली जाते.

Maha TET Exam Online: महा टीईटी परीक्षा पुढच्या वर्षापासून ऑनलाईन होणार; पेपर लीकनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

कमांडो सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड (PF) आणि आजीवन पेन्शनचा लाभ मिळतो. सर्वच अधिकाऱ्यांना एकसमान पेन्शन मिळत नाही; पेन्शनची रक्कम ही त्यांचा शेवटचा पगार, पद आणि त्यांनी किती वर्षे सेवा केली आहे यावर अवलंबून असते. याशिवाय त्यांना निवृत्तीनंतरही आजीवन मोफत वैद्यकीय सुविधा आणि इतर सेवानिवृत्ती लाभ मिळत राहतात.

Web Title: Nsg commandos salary structure allowance pension benefits recruitment process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • BSF
  • cisf constable
  • CRPF
  • Government Job
  • High salary Job
  • India army

संबंधित बातम्या

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर
1

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर

MPSC चा मोठा निर्णय; राज्य सेवा २०२५ च्या कॉप्यांची पुन्हा तपासणी, २०२६ च्या परीक्षाही पुढे ढकलल्या!
2

MPSC चा मोठा निर्णय; राज्य सेवा २०२५ च्या कॉप्यांची पुन्हा तपासणी, २०२६ च्या परीक्षाही पुढे ढकलल्या!

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!
3

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!
4

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.