फोटो सौजन्य- सोशल मीडिया
RRB Technician Recruitment 2026 Online Application Form : रेल्वेमध्ये टेक्निशियन बनण्याची सुवर्णसंधी उमेदवारांसमोर आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRB) ६,५६५ टेक्निशियन पदांच्या भरतीसाठी संक्षिप्त अधिसूचना जारी केली आहे. यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच ३० जून २०२६ पासून सुरू होणार आहे. पात्र उमेदवार २९ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरू शकतील. या भरतीचा संपूर्ण तपशील आता आपण पाहणार आहोत.
टेक्निशियन ग्रेड-III: उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण केलेली असावी. सोबतीला संबंधित ट्रेडमधील NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त आयटीआय (ITI) सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांकडे ‘अॅक्ट अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट’ आहे, ते देखील अर्ज करू शकतात.
टेक्निशियन ग्रेड-I (सिग्नल): या पदासाठी उमेदवाराकडे संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील पदवी (Degree) किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
टेक्निशियन ग्रेड-I (सिग्नल): उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असावे.
टेक्निशियन ग्रेड-III: किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
१. कॉम्प्युटर आधारित परीक्षा (CBT): सर्वात आधी उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा घेतली जाईल.
२. दस्तावेज पडताळणी (Document Verification): लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
३. वैद्यकीय चाचणी (Medical Examination): अंतिम टप्प्यात उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. हे तिन्ही टप्पे यशस्वीपणे पार पाडणाऱ्या उमेदवारांची अंतिम नियुक्ती केली जाईल.
टेक्निशियन ग्रेड-I: ७ व्या वेतन आयोगानुसार ‘पे लेव्हल-५’ अंतर्गत २९,२०० रुपये प्रतिमहिना मूळ पगार (Basic Salary) मिळेल.
टेक्निशियन ग्रेड-III: ‘पे लेव्हल-२’ नुसार १९,९०० रुपये प्रतिमहिना सुरुवातीचा मूळ पगार मिळेल.
इतर फायदे: मूळ पगाराव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), वाहतूक भत्ता (TA), पेन्शन, रेल्वे प्रवास सवलत आणि मोफत वैद्यकीय सुविधा देखील मिळतील.
इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम आरआरबीच्या (RRB) अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपले खाते तयार करावे. त्यानंतर संबंधित CEN आणि रेल्वे झोनची निवड करावी. अर्ज पूर्ण भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ऑनलाईन फी भरावी आणि फॉर्म सबमिट करावा. भविष्यातील संदर्भासाठी अर्ज पावतीची प्रिंटआउट काढून स्वतःकडे जपून ठेवावी.






