Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकरावी प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १.५३ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या फेरीअखेर १ लाख ५३ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. यापैकी १ लाख ३९ हजार ७१५ विद्यार्थ्यांनी कॅप प्रक्रियेतून, तर १३ हजार ९९३ विद्यार्थ्यांनी विविध कोट्यांतून प्रवेश घेतला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 30, 2026 | 08:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

नीता परब, मुंबई : राज्यातील इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या प्रवेश फेरीअखेर शनिवारी सायंकाळपर्यंत राज्यभरातील १ लाख ५३ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. यापैकी १ लाख ३९ हजार ७१५ विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप) अंतर्गत, तर १३ हजार ९९३ विद्यार्थ्यांनी विविध कोट्यांतून प्रवेश घेतल्याची माहिती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.

IIM Mumbai Jobs: आयआयएम मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज!

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ९ हजार ५९१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १२ लाख ५१ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ८ लाख ८७ हजार २६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ पूर्ण करून प्रक्रियेत अंतिम सहभाग नोंदवला आहे.

विभागनिहाय आकडेवारीनुसार, पुणे विभागात सर्वाधिक ३२ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्याखालोखाल मुंबई विभागात २३ हजार ५८ आणि नागपूर विभागात २१ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. याशिवाय कोल्हापूर विभागात १८ हजार ४२३, नाशिक विभागात १८ हजार ८७४, अमरावती विभागात १५ हजार ६०८, छत्रपती संभाजीनगर विभागात १४ हजार ७८२ आणि लातूर विभागात ८ हजार ५३६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

दरम्यान, पहिल्या फेरीत महाविद्यालयांचे वाटप होऊनही अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांनी ३ जून २०२६ पूर्वी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. तसेच विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी याची नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असेही डॉ. पालकर यांनी स्पष्ट केले.

CBSE Exam: सीबीएसईचा मोठा निर्णय; ‘या’ वर्षापासून उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी थेट ऑनलाईन मिळणार!

विभागनिहाय आकडेवारीनुसार, अमरावती विभागात १३ हजार ८६५ विद्यार्थ्यांनी कॅप प्रक्रियेतून आणि १ हजार ७४३ विद्यार्थ्यांनी कोट्यातून प्रवेश घेतला असून एकूण प्रवेशसंख्या १५ हजार ६०८ इतकी आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात १४ हजार ७८२, कोल्हापूर विभागात १८ हजार ४२३, लातूर विभागात ८ हजार ५३६, मुंबई विभागात २३ हजार ५८, नागपूर विभागात २१ हजार ६८३, नाशिक विभागात १८ हजार ८७४ आणि पुणे विभागात सर्वाधिक ३२ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. राज्यभरात कॅप प्रक्रियेतून १ लाख ३९ हजार ७१५ आणि विविध कोट्यांतून १३ हजार ९९३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, एकूण प्रवेशसंख्या १ लाख ५३ हजार ७०८ इतकी झाली आहे.

Web Title: Overwhelming response from students to class 11 admission process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • 11th Admission
  • Career
  • education

संबंधित बातम्या

AI In Healthcare: हेल्थकेअर क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी! आयआयटी मद्रासने सुरू केला ‘AI-हेल्थकेअर’ कोर्स
1

AI In Healthcare: हेल्थकेअर क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी! आयआयटी मद्रासने सुरू केला ‘AI-हेल्थकेअर’ कोर्स

शिक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना आर्त साद, तब्बल सहा पोती पोस्टकार्डद्वारे लाखो आदिवासी मुलांनी केली विनंती
2

शिक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना आर्त साद, तब्बल सहा पोती पोस्टकार्डद्वारे लाखो आदिवासी मुलांनी केली विनंती

City of Flags: भारतातील ‘या’ शहराला का म्हटले जाते झेंड्यांचे शहर? जाणून घ्या तिरंग्याचा अनोखा इतिहास…
3

City of Flags: भारतातील ‘या’ शहराला का म्हटले जाते झेंड्यांचे शहर? जाणून घ्या तिरंग्याचा अनोखा इतिहास…

Mira Bhayandar News : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा आरोप; मनसे विद्यार्थी सेनेचे अर्धनग्न आंदोलन, प्रशासनाला अल्टिमेटम
4

Mira Bhayandar News : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा आरोप; मनसे विद्यार्थी सेनेचे अर्धनग्न आंदोलन, प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.