Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा आरोप; मनसे विद्यार्थी सेनेचे अर्धनग्न आंदोलन, प्रशासनाला अल्टिमेटम

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या कथित निष्काळजी कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अर्धनग्न आंदोलन केले. अनधिकृत शाळांची यादी जाहीर न करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य न वाटणे आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती न केल्याचा आरोप करत प्रशासनाला तातडीने कारवाईचा इशारा देण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 14, 2026 | 05:53 PM
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा आरोप; मनसे विद्यार्थी सेनेचे अर्धनग्न आंदोलन, प्रशासनाला अल्टिमेटम

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा आरोप; मनसे विद्यार्थी सेनेचे अर्धनग्न आंदोलन, प्रशासनाला अल्टिमेटम

Follow Us
Follow Us:
  • अनधिकृत शाळांची यादी अद्याप नाही
  • मनसे विद्यार्थी सेनेचा शिक्षण विभागावर हल्लाबोल
  • प्रशासनाला अल्टिमेटम
विजय काते, भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या कथित भोंगळ आणि निष्काळजी कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. अनेक वेळा निवेदने आणि पत्रव्यवहार करूनही शिक्षण विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप करत आंदोलकांनी विभागीय अधिकाऱ्यांचा निषेध केला.

मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही महानगरपालिकेकडून अद्याप अनधिकृत शाळांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात शाळांमध्ये आवश्यक जनजागृती करण्यात आलेली नसल्याचाही आरोप करण्यात आला.

Mumbai : आज म्हैस पडली, उद्या माणूस पडला तर? तपोवन शाळेजवळील उघड्या चेंबरमुळे नागरिक संतप्त

आंदोलकांनी आणखी आरोप केला की, शाळकरी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शैक्षणिक साहित्य अद्याप वितरित करण्यात आलेले नाही. या सर्व मुद्द्यांवर अनेक वेळा लेखी निवेदने आणि पत्रे देऊनही शिक्षण विभागाने कोणतीही दखल घेतली नसल्याने अखेर अर्धनग्न आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. मनसे विद्यार्थी सेनेने प्रशासनावर नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. अधिकाऱ्यांच्या मुजोर भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा दावा करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान प्रशासनाने प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवावेत, अन्यथा यापेक्षाही उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनामुळे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मनसे विद्यार्थी सेनेच्या प्रमुख मागण्या

मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी तात्काळ जाहीर करावी.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व शाळांमध्ये प्रभावी जनजागृती मोहीम राबवावी.

शाळकरी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रलंबित शैक्षणिक साहित्य तातडीने वितरित करावे.

शिक्षण विभागाने नागरिक आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनांची त्वरित दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी.

शिक्षण विभागाच्या कथित निष्काळजी व भोंगळ कारभाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देत नियमित देखरेख आणि अंमलबजावणी सुनिश्चित करावी.

प्रशासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Mira Bhayandar News : कोट्यवधींच्या निविदा, तरी उघडी चेंबर्स कायम! म्हशीच्या घटनेनंतर मिरा-भाईंदर मनपा पुन्हा वादात

Web Title: Mira bhayandar mns vidyarthi sena half nude protest against education department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • education
  • mira bhayandar
  • MNS
  • Student

संबंधित बातम्या

Dr. Sarvepalli Radhakrishnan Education: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण किती झाले होते? जाणून घ्या एका क्लिकवर
1

Dr. Sarvepalli Radhakrishnan Education: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण किती झाले होते? जाणून घ्या एका क्लिकवर

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा
2

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका
3

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज
4

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.