Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना आर्त साद, तब्बल सहा पोती पोस्टकार्डद्वारे लाखो आदिवासी मुलांनी केली विनंती

महाराष्ट्रातील लाखो आदिवासी मुलांनी ३ ते १८ वर्षांपर्यंत मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या हक्कासाठी पोस्टकार्ड मोहिमेद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भावनिक साद घातली आहे. या अभियानात तब्बल दोन लाखांहून अधिक पोस्टकार्ड मुख्यमंत्री कार्यालयात पाठवण्यात आली.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 15, 2026 | 03:31 PM
शिक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना आर्त साद, तब्बल सहा पोती पोस्टकार्डद्वारे लाखो आदिवासी मुलांनी केली विनंती

शिक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना आर्त साद, तब्बल सहा पोती पोस्टकार्डद्वारे लाखो आदिवासी मुलांनी केली विनंती

Follow Us
Follow Us:
  • ३ ते १८ वर्षांपर्यंत मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या मागणीसाठी लाखो आदिवासी मुलांची पोस्टकार्ड मोहीम.
  • मुख्यमंत्री कार्यालयात सहा पोत्यांमध्ये हजारो पोस्टकार्ड पोहोचली; अधिकृत नोंद करण्यात आली.
  • ‘प्रिय देवाभाऊ, प्रत्येक मुलाला ३ ते १८ वर्षांपर्यंत मोफत शिक्षण द्या’ असा एकच संदेश सुमारे दोन लाख पोस्टकार्डवर लिहिण्यात आला.
आजच्या व्हॉट्सऍप संदेशांच्या आणि सोशल मीडियाच्या झपाट्याच्या युगात, साध्या पिवळ्या पोस्टकार्डनि महाराष्ट्रातील आदिवासी भागात पुन्हा इतिहास घडवला आहे. लाखो आदिवासी मुलांनी आपल्या आयुष्याचा मार्ग बदलू शकणाऱ्या एका मूलभूत हक्कासाठी एकजुटीने आवाज उठवला आहे.३ ते १८ वर्षांपर्यंत सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे यासाठी हा लढा सुरू आहे. सोमवारी या मुलांच्या आशा, अपेक्षा आणि भावनांनी भरलेल्या हजारो पोस्टकार्डानी अखेर मुंबईतील मुख्यमंत्री कार्यालयाचे (सीएमओ) दार ठोठावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून पाठवण्यात आलेल्या सहा मोठ्या पोत्यांमध्ये भरलेली हजारो पोस्टकार्ड कार्यालयात पोच झाली असून त्यांची अधिकृत नोंद करण्यात आली आहे.

POCSO Act Misuse: पालक ‘प्रतिष्ठेसाठी’ फौजदारी गुन्हे दाखल करतात; पॉक्सो कायद्याच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयाची चिंता

पोस्ट विभागासाठी हा अभूतपूर्व अनुभव ठरला आहे. २ जुलै २०२६ पासून राज्यातील दुर्गम आदिवासी भागांतील पोस्ट कार्यालयांतून मोठ्या प्रमाणावर पोस्टकार्डाचा ओघ सुरू झाला. पोस्टमन आणि कर्मचारी रात्रंदिवस शिक्कामोर्तब करण्याचे काम करत आहेत.

वयाच्या १४ वर्षांनंतरही शिक्षणाचा हक्क हवा

  • सध्या शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायदा केवळ १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षणाची हमी देतो. मात्र, बदलत्या काळात दारिद्रयाचे चक्र तोडण्यासाठी एवढे शिक्षण अपुरे असल्याचे श्रमजीवी संघटनेचे मत आहे.
  • ३ ते १८ वर्षांपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण हा विचार श्रमजीवी संघटनेचे संस्थापक, माजी आमदार आणि महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी मांडला.
  • संघटनेच्या संस्थापिका विद्युल्लता पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त या अभियानाला सुरुवात करण्यात आली.
    या पोस्टकार्ड मोहिमेपूर्वी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंबईतील विधानभवनात
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन आणि पोस्टकार्डाची भव्य प्रत त्यांना सादर केली होती.
  • ही मागणी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० आणि नीती आयोगाच्या शिफारशीशी सुसंगत असून प्रत्येक मुलाला माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाला बळ देणारी आहे.
  • मुलांनी आपले काम केले आहे. त्यांनी आपल्या मनातील भावना पोस्टकार्डातून मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचवल्या आहेत.
  • आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ‘देवाभाऊं ‘कडे लागले आहे. या लाखो मुलांच्या आर्त हाकेला मुख्यमंत्री काय प्रतिसाद देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Delimitation Bill: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा? सुप्रिया सुळेंनी स्पष्टचं सांगितलं

पोस्ट कार्डवर कोणता संदेश दिला आहे ?

  • अनेक ठिकाणी पोस्टपेटवाव या पोस्टकार्डानी अक्षरशः भरून वाहू लागल्या. श्रमजीवी संघटनेच्या राज्यव्यापी अभियानादरम्यान भिवंडी, वसई, मुरबाड, वाडा, कल्याण आणि इतर अनेक भागांत अत्यंत भावनिक दृश्ये पाहायला मिळाली.
  • मुसळधार पावसाची पर्वा न करता लहान मुले एकलव्याचा वेश परिधान करून गावोगावी मिरवणुका काढत होती.
  • हातात पिवळी पोस्टकार्ड घेऊन त्यानी आपल्या गावातील पोस्ट कार्यालयांमध्ये जाऊन पोस्टमनची आरती ओवाळून ती लाल पोस्टपेटीत टाकली. सुमारे दोन लाख पोस्टकार्डावर एकच संदेश लिहिला होता, ‘प्रिय देवाभाऊ, महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला ३ ते १८ वर्षांपर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण द्या.

Web Title: Lakhs of tribal children send postcards to cm devendra fadnavis demanding free education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • devendra fadamvis
  • education
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Data Science skills: डेटा सायन्समध्ये करिअर करून लाखोंची कमाई करायचीय? तुमच्याकडे या ६ स्किल्स आहेत का?
1

Data Science skills: डेटा सायन्समध्ये करिअर करून लाखोंची कमाई करायचीय? तुमच्याकडे या ६ स्किल्स आहेत का?

National Teachers Award: राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची निवड प्रक्रिया कशी असते आणि विजेत्यांना काय मिळते? जाणून घ्या.
2

National Teachers Award: राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची निवड प्रक्रिया कशी असते आणि विजेत्यांना काय मिळते? जाणून घ्या.

Chandrapur News: खडसंगी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; शासकीय जागेवरील इमारतीच्या फेरफार नोंदीचा मुद्दा ऐरणीवर
3

Chandrapur News: खडसंगी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; शासकीय जागेवरील इमारतीच्या फेरफार नोंदीचा मुद्दा ऐरणीवर

Raigad News: माथेरानमध्ये ३२ जणांना ई-रिक्षा, मग उर्वरित ६२ जणांचं काय? शहरात पुन्हा आंदोलनाची चाहूल
4

Raigad News: माथेरानमध्ये ३२ जणांना ई-रिक्षा, मग उर्वरित ६२ जणांचं काय? शहरात पुन्हा आंदोलनाची चाहूल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.