Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer News: खरीपने रडवले, रब्बीची आशाही धूसर! पाण्याअभावी तूर पीकही संकटात; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

Washim Shirpur Jain Shirpur Jain Tur Crop Loss: शिरपूर जैन परिसरात कमी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले असून, पाण्याअभावी तूर आणि हळद पिकांनाही फटका बसत आहे. खरीपच्या नुकसानीनंतर रब्बीची पेरणीही मर्यादित राहिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 19, 2026 | 08:36 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • शिरपूर जैनमध्ये दुष्काळाचे सावट गडद
  • सोयाबीननंतर तूर- हळद पिकांनाही पाण्याचा फटका
  • उत्पादन घटण्याची शक्यता
शिरपूर जैन: यंदा पावसाने शिरपूर जैन परिसरात ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आता रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट गडद झाले. अत्यल्प पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटल्यानंतर आता तूर पीकही पाण्याअभावी दैनावस्थेत पोहोचले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून रात्रीच्या तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढत असला, तरी पिकांना आवश्यक ओलावा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. अनेक शेतांमध्ये पिके कोमेजू लागली असून, काही शेतजमिनी रब्बीच्या पेरणीविना रिकाम्याच पडून आहेत.

Drought News : राज्यातील आणखी ६ तालुके दुष्काळी घोषित! एकूण संख्या ३१० वर; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले असते, तर सोयाबीन आणि तूर या दोन्ही पिकांचे उत्पादन चांगले मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका खरीप हंगामाला बसला. कमी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन कमालीचे घटले. काही शेतकऱ्यांच्या हाती अत्यल्प उत्पादन आले, तर काहींचा लागवडीचा खर्चही वसूल होऊ शकला नाही. त्यातच आता तूर पिकाचीही अवस्था बिकट झाली आहे. पाण्याअभावी तुरीची वाढ खुंटली असून, उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांनाही पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने या पिकाच्या उत्पन्नात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा?

खरीप हंगामातील नुकसान आणि रब्बी हंगामातील अनिश्चितता यामुळे शिरपूर जैन परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीच्या उत्पन्नावर वर्षभराचा उदरनिर्वाह अवलंबून असताना यंदा हातात पुरेसे उत्पादन येण्याची चिन्हे नाहीत. शेतीचा खर्च, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि आगामी हंगामाची तयारी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. पावसाअभावी दोन्ही हंगामांवर संकट ओढवल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

रब्बीची पेरणीही मर्यादित

शेतात ओलावा नसल्याने अनेक शेतकऱ्याऱ्यांनी यंदा रब्बी हंगामाची पेरणीच टाळली, ज्या शेतकऱ्यांकडे काही प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे, त्यांनी मोजक्याच क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी केली. मात्र, पुढील काळात पाणी उपलब्ध होईल की नाही, याची शाश्वती नसल्याने या पिकांच्या वाढीबाबतही शेतकरी साशंक आहेत.

Washim News: रिसोड एसटी आगारात अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली, शिवीगाळ अन् धमकीचे आरोप; पोलिसांकडे केली कारवाईची मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिरपूर जैन परिसरात यंदा खरीप पिकांचे नुकसान का झाले?

    Ans: कमी आणि अनियमित पावसामुळे सोयाबीनसह इतर खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे.

  • Que: तूर पिकावर पाणीटंचाईचा काय परिणाम झाला आहे?

    Ans: पाण्याअभावी तूर पिकाची वाढ खुंटली असून उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

  • Que: हळद उत्पादक शेतकऱ्यांसमोर कोणते संकट आहे?

    Ans: सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने हळदीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.

Web Title: Shirpur jain tur crop damage water shortage farmer crisis pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 08:26 PM

Topics:  

  • Crisis on farmers
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News: रिसोड एसटी आगारात अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली, शिवीगाळ अन् धमकीचे आरोप; पोलिसांकडे केली कारवाईची मागणी
1

Washim News: रिसोड एसटी आगारात अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली, शिवीगाळ अन् धमकीचे आरोप; पोलिसांकडे केली कारवाईची मागणी

Buldhana: शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट! खरीपने दिला फटका,आता रब्बीचा हंगामही अडचणीत; ९० हजार हेक्टरवरच पेरणी
2

Buldhana: शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट! खरीपने दिला फटका,आता रब्बीचा हंगामही अडचणीत; ९० हजार हेक्टरवरच पेरणी

Washim: महावितरणची अभय योजना; वीजबिल थकबाकीवरील व्याज आणि दंड १०० टक्के माफ, ६१ हजार ग्राहकांना होणार लाभ
3

Washim: महावितरणची अभय योजना; वीजबिल थकबाकीवरील व्याज आणि दंड १०० टक्के माफ, ६१ हजार ग्राहकांना होणार लाभ

Washim: वाशिम-मालेगावमध्ये पाणीटंचाईची भीती; सोनल प्रकल्पात केवळ १५.६६ टक्के जलसाठा, नवीन प्रकल्पाची मागणी जोरात
4

Washim: वाशिम-मालेगावमध्ये पाणीटंचाईची भीती; सोनल प्रकल्पात केवळ १५.६६ टक्के जलसाठा, नवीन प्रकल्पाची मागणी जोरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.