Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malegaon News: मालेगावला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नगर पंचायतीचा पुढाकार; व्यापारी अन् नागरिकांना केले आवाहन

Malegaon Nagar Panchayat Plastic Ban Campaign: मालेगाव नगर पंचायतीच्या वतीने आठवडी बाजार आणि मुख्य बाजारपेठेत प्लास्टिक बंदी व कापडी पिशव्यांच्या वापराबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 19, 2026 | 09:04 PM
Malegaon Nagar Panchayat Plastic Ban Campaign

Malegaon Nagar Panchayat Plastic Ban Campaign

Follow Us
Follow Us:
  • प्लास्टिकमुक्त मालेगावसाठी प्रशासनाचा पुढाकार
  • व्यापारी आणि नागरिकांना दिला स्वच्छतेचा मंत्र
  • कापडी पिशव्यांच्या वापरासाठी नगर पंचायतीचे आवाहन
मालेगाव: शहराचे पर्यावरण स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासोबतच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मालेगाव नगर पंचायत प्रशासनाने जनजागृतीचा पुढाकार घेतला. शहरात प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि नागरिकांमध्ये पाणी बचतीविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने नगर पंचायतीच्या वतीने आठवडी बाजार तसेच मुख्य बाजारपेठेच्या परिसरात विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान नगर पंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यापारी, दुकानदार आणि बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले. प्लास्टिक पिशव्यांऐवजी पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा संदेश देत नागरिकांनी घराबाहेर पडताना सोबत कापडी पिशवी ठेवण्याची सवय अंगीकारावी, असे आवाहन करण्यात आले. (Malegaon News)

महायुती सरकारला घरचा आहेर! नामांतराच्या मुद्द्यावरून पुण्यात आरपीआय आठवले गटाचे मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन

प्लॅस्टिक कचऱ्यामुळे नाल्या तुंबणे, परिसरात अस्वच्छता निर्माण होणे, माती व पर्यावरणाचे प्रदूषण वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे प्लॅस्टिकमुक्त शहर घडविण्यासाठी प्रशासनासोबतच व्यापारी आणि नागरिकांनीही जबाबदारीने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे या वेळी पटवून देण्यात आले, व्यावसायिकांनी ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देण्याऐवजी कापडी पिशव्यांच्या वापरासाठी प्रोत्साहित करावे, असेही सांगण्यात आले.

केवळ प्लास्टिक बंदीच नव्हे, तर पाण्याची वाढती गरज आणि भविष्यात उद्भवू शकणारी पाणीटंचाई लक्षात घेता जलसंवर्धनाचाही संदेश या मोहिमेतून देण्यात आला. नळ सुरू ठेवून पाण्याचा अपव्यय करू नये, आवश्यक तेवढेच पाणी वापरावे, गळती तातडीने दुरुस्त करावी आणि पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान समजून त्याची बचत करावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

ही मोहीम नगर पंचायतचे मुख्याधिकारी पंकज सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी कर निरीक्षक अ. अजिज अ. सत्तार, स्वच्छता निरीक्षक किशोर पंडित, पाणीपुरवठा अभियंता योगेश तायडे, सहाय्यक कर निरीक्षक अरुण समुन्द्रे, शहर समन्वयक मोहम्मद मारुफ, तसेच सै. इरफान, प्रमोद भाऊ हरणे, कमलेश कोळी, अनंता घुगे, रिजवान भाई आदी उपस्थित होते.

नगर पंचायत मालेगावचे नगराध्यक्ष,ओमप्रकाश मधुकरराव खुरसडे म्हणाले की, प्लास्टिक कचरा हा पर्यावरणासाठी गंभीर धोका असून, त्यामुळे शहराच्या स्वच्छतेवर विपरित परिणाम होतो. प्लॅस्टिकमुळे मुक्या प्राण्याच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे माझे मालेगाव, स्वच्छ मालेगाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक नागरिक आणि व्यापाऱ्याने प्लॅस्टिक बंदी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, कापडी पिशव्यांचा वापर ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर पाण्याचा जपून वापर करून जलसंवर्धनाला प्राधान्य दिल्यास आपले मालेगाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शहर म्हणून नक्कीच नावारूपास येईल.

नगर पंचायत मालेगावचे मुख्याधिकारी, पंकज सोनुने म्हणाले की, मालेगाव शहर प्लॅस्टिकमुक्त, स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही केवळ नगर पंचायत प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे. जनजागृतीसोबतच नागरिकांच्या दैनंदिन सवयींमध्ये बदल होणे गरजेचे आहे. बाजारात जाताना प्रत्येकाने कापडी पिशवी सोबत ठेवावी, तर व्यापाऱ्यांनी सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्याचप्रमाणे पाणी ही मर्यादित आणि अमूल्य नैसर्गिक संपत्ती असल्याने त्याचा अपव्यय टाळून प्रत्येकाने जलसंवर्धनासाठी योगदान द्यावे.

Drought News : राज्यातील आणखी ६ तालुके दुष्काळी घोषित! एकूण संख्या ३१० वर; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: मालेगाव नगर पंचायतीने कोणती जनजागृती मोहीम राबवली?

    Ans: प्लास्टिक बंदी आणि पाणी बचतीबाबत नगर पंचायतीने जनजागृती मोहीम राबवली.

  • Que: नगर पंचायतीने नागरिकांना कोणते आवाहन केले?

    Ans: प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले.

  • Que: प्लास्टिक कचऱ्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात?

    Ans: प्लास्टिक कचऱ्यामुळे नाल्या तुंबतात, अस्वच्छता वाढते आणि पर्यावरणाचे प्रदूषण होते.

Web Title: Malegaon nagar panchayat plastic ban water conservation campaign pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • buldhana news
  • Malegaon
  • plastic bag

संबंधित बातम्या

Buldhana: शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट! खरीपने दिला फटका,आता रब्बीचा हंगामही अडचणीत; ९० हजार हेक्टरवरच पेरणी
1

Buldhana: शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट! खरीपने दिला फटका,आता रब्बीचा हंगामही अडचणीत; ९० हजार हेक्टरवरच पेरणी

Buldhana: दुष्काळाच्या संकटात शासनाचा आधार; बुलढाणा जिल्ह्यात २१५ कोटींचे अनुदान वितरित;  ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत
2

Buldhana: दुष्काळाच्या संकटात शासनाचा आधार; बुलढाणा जिल्ह्यात २१५ कोटींचे अनुदान वितरित; ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत

Buldhana News: निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देवरांचे आवाहन
3

Buldhana News: निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देवरांचे आवाहन

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका! कंटेनरची एकापाठोपाठ  १६ कारला धडक; अनेक जखमी
4

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका! कंटेनरची एकापाठोपाठ १६ कारला धडक; अनेक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.