Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांची निवड कशी होते? जाणून घ्या कोणत्या ३ समुदायांचे जवानच बनतात President’s Bodyguard?

President's Bodyguard, PBG history : राष्ट्रपती पद हे देशातील सर्वात महत्त्वाच्या संवैधानिक पदांपैकी एक आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांची निवडही सामान्य पद्धतीने होत नाही.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 09, 2026 | 02:25 PM
President's Bodyguard

President's Bodyguard

Follow Us
Follow Us:

President’s Bodyguard: जेव्हा राष्ट्रपती कोणत्याही मोठ्या राष्ट्रीय सोहळ्यात सहभागी होतात, तेव्हा त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर सर्वांचे लक्ष असते. प्रजासत्ताक दिनानंतर होणाऱ्या ‘बीटिंग रिट्रीट’ सोहळ्यातही राष्ट्रपती सोबत खास गणवेशातील घोडदळाचे जवान दिसून येतात. हे जवान राष्ट्रपतीच्या अंगरक्षकांचा म्हणजेच प्रेसिडेंट्स बॉडीगार्डचा (PBG) भाग असतात. त्यांचा शानदार गणवेश, घोडे आणि शिस्तीमुळे PBG ची एक वेगळी ओळख आहे.

तसेच, राष्ट्रपती पद हे देशातील सर्वात महत्त्वाच्या संवैधानिक पदांपैकी एक आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांची निवडही सामान्य पद्धतीने होत नाही. PBG ही भारतीय सैन्याची सर्वात जुनी रेजिमेंट आहे. याची सुरुवात १७७३ मध्ये तत्कालीन गव्हर्नर-जनरल वॉरेन हेस्टिंग्स यांनी बनारसमध्ये केली होती. त्यावेळी यात ५० घोडदवार सैनिक होते. नंतर याची संख्या वाढवण्यात आली. १९५० मध्ये भारत प्रजासत्ताक बनल्यानंतर या युनिटचे नाव ‘प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड’ (President’s Bodyguard) ठेवण्यात आले.

कोणत्या ३ समुदायांचे जवानच बनतात राष्ट्रापतींचे अंगरक्षक?

वास्तविक, राष्ट्रपतीच्या अंगरक्षकांमध्ये फक्त जाट, शिख आणि राजपुत समुदायाच्या सैनिकांचीच भरती केली जाते. ऐतिहासिकदृष्ट्या या रेजिमेंटमध्ये या समुदायांमधून सैनिकांची भरती करण्याची परंपरा राहिली आहे. तथापि, PBG मध्ये जवानांची निवड विशेष शारीरिक क्षमता, लष्करी पात्रता आणि कठीण निवड प्रक्रियेच्या आधारावर केली जाते. म्हणजेच राष्ट्रपतींचे अंगरक्षक होणे केवळ एखाद्या विशिष्ट समुदायातून येण्यापुरते मर्यादित नाही. यासाठी सैनिकाला अनेक कठीण मानदंडांवर खरे उतरावे लागते. याच कारणामुळे PBG ला भारतीय सैन्याची निवडक आणि स्पेशल युनिट मानले जाते.

केवळ उंची जास्त असणेच पुरेसे नाही

PBG मध्ये समाविष्ट होणाऱ्या सैनिकांसाठी शारीरिक क्षमता अत्यंत महत्त्वाची असते. जास्त उंची आणि बळकट शरीर असलेल्या सैनिकांना या भूमिकेसाठी योग्य मानले गेले आहे. परंतु, केवळ उंचीच्या आधारावर कोणत्याही सैनिकाला राष्ट्रपतींचा अंगरक्षक बनवले जात नाही. निवड प्रक्रियेत त्याची फिटनेस, घोडदवार कौशल्य आणि लष्करी क्षमता देखील महत्त्वाची असते. राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत माहितीनुसार, आज PBG मध्ये विशेष शारीरिक वैशिष्ट्ये असलेल्या जवानांची निवड केली जाते आणि यासाठी कठीण शारीरिक प्रक्रियेतून जावे लागते.

SBI Recruitment 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेकडून १२ हजार पदांवर भरती! ‘या’ पदांसाठी जागा भरणार

युद्ध कौशल्यातही असतात सक्षम

PBG ला केवळ एका सोहळ्यात सहभाग घेणारी युनिट समजणे योग्य ठरणार नाही. या युनिटचे जवान घोडदहळात निपुण असण्यासोबतच पॅराट्रूपर आणि आर्मर्ड वॉरियर म्हणूनही प्रशिक्षित असतात. अधिकृत माहितीनुसार, PBG ची भूमिका शांततेच्या काळात राष्ट्रपतींशी संबंधित सोहळ्यांमध्ये आणि गरज भासल्यास लष्करी मोहिमांमध्येही राहिली आहे. याच कारणामुळे राष्ट्राध्यक्षांच्या अंगरक्षकाची जबाबदारी केवळ राष्ट्राध्यक्षांसोबत चालणे किंवा परेडमध्ये सहभाग घेण्यापुरती मर्यादित नाही. या सैनिकांना प्रत्येक परिस्थितीसाठी तयार ठेवले जाते.

१७७३ पासून चालत आलेली गौरवशाली परंपरा

PBG चा इतिहास सुमारे अडीच शतके जुना आहे. १७७३ मध्ये बनलेली ही युनिट आधी ‘गव्हर्नर-जनरल्स बॉडीगार्ड’ या नावाने ओळखली जात होती. नंतर त्याला ‘व्हाईसरॉयझ बॉडीगार्ड’ म्हटले गेले आणि भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर २७ जानेवारी १९५० रोजी याचे नाव ‘प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड’ (President’s Bodyguard) करण्यात आले.

AI Impact on Education: अभ्यासात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अतिवापर पडतोय महागात; OECD च्या अहवालात मोठा खुलासा!

आज PBG ही भारतीय सैन्याची सर्वात जुनी रेजिमेंट आहे आणि ती राष्ट्राध्यक्षांची स्वतःची लष्करी युनिट मानली जाते. तिच्या जवानांचा गणवेश, घोडदळ आणि परेडची शानदार परंपरा तिला सैन्याच्या इतर युनिट्सपेक्षा वेगळी ओळख मिळवून देते.

Web Title: Presidents bodyguard pbg history selection process indian army

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Government Job
  • indian army
  • President draupadi murmu

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या रोषाची धग वाढली! MPSC च्या कारभाराविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी रस्त्यावर
1

विद्यार्थ्यांच्या रोषाची धग वाढली! MPSC च्या कारभाराविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी रस्त्यावर

Sahitya Akademi Recruitment 2026 : १०वी-१२वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; साहित्य अकादमीत ‘या’ पदांची बंपर भरती
2

Sahitya Akademi Recruitment 2026 : १०वी-१२वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; साहित्य अकादमीत ‘या’ पदांची बंपर भरती

MPSC Recruitment 2026: महाराष्ट्र शासनात अधिकारी होण्याची संधी; MPSC तर्फे ‘या’ रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू
3

MPSC Recruitment 2026: महाराष्ट्र शासनात अधिकारी होण्याची संधी; MPSC तर्फे ‘या’ रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू

Indian Army: सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न आहे का? जाणून घ्या मेजर आणि ब्रिगेडियरमध्ये नेमका काय फरक आहे?
4

Indian Army: सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न आहे का? जाणून घ्या मेजर आणि ब्रिगेडियरमध्ये नेमका काय फरक आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.