Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्य हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन! काय आहे कौशल्य विकास केंद्र?

उद्या शुक्रवार दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी  दुपारी 12.00 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाविद्यालयामधील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन होणार आहे. जाणून घ्या या केंद्राबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Sep 19, 2024 | 06:29 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरसाठी पदवी पुरेशी नसून त्यांच्याकडे कौशल्य असणे ही गरजेचे आहे. या पदवी आणि कौशल्याच्या जोरावर ते उत्तम करिअर करु शकतात. यासाठीच राज्यसरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. व्यावसायिक शिक्षणातून कौशल्य विकास या संकल्पनेचा फायदा अधिकाधिक युवक-युवतींना होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण 1000 महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे सुरु होणार आहेत. त्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दिनांक 20 सप्टेंबर रोजी केले जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे वर्धा येथे या कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन करतील त्याचबरोबर राज्यातील अन्य भागातील केंद्रांचे दूरदृश्य प्रणाली द्वारे उद्घाटन केले जाणार आहे. या कार्यक्रमास राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,  कौशल्य, रोजगार, उद्योजकता  व नाविन्यता  मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित असणार आहेत.

हे देखील वाचा-देशातील विविध Army Public School मध्ये शिक्षकांसाठी भरतीप्रक्रिया सुरु, आजच करा अर्ज

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची संकल्पना कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडली. राज्यातील कानाकोपऱ्यातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये कौशल्य विकास व्हावे यासाठीच 1000 महाविद्यालयांमध्ये ही केंद्रे सुरु केली जात आहेत. त्यामुळे शहरातील आणि गावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला याचा प्रचंड फायदा होणार आहे. या अंतर्गत दरवर्षी प्रत्येक महाविद्यालयातील केंद्रामध्ये 150 विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशा पध्दतीने प्रत्येक महाविद्यालयात प्रशिक्षणानुसार वर्षभरात तब्बल दीड लाख तरुणांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हे देखील वाचा-UK ने स्टडी व्हिसा नियमांमध्ये केले ‘हे’ मोठे बदल; भारतीय विद्यार्थ्यांना फायदा होणार की नुकसान?

रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी युवक- युवतींना उपलब्ध होणार

आचार्य कौशल्य विकास केंद्रांमध्ये  200 ते 600 तासांचे म्हणजेच साधारणत: 3 महिन्यांचे  National Skills Qualification Framework (NSQF) सुसंगत असलेले अल्प मदतीचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. स्थानिक उद्योगांची गरज लक्षात घेवून उद्योग आस्थापनांना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होवून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी युवक- युवतींना उपलब्ध होणार आहेत.

या केंद्रांमुळे रोजगारनिर्मिती वाढणार आहे. त्यामुळे महाविद्यालयातील युवकांनी यामध्ये सहभागी व्हावे आणी कौशल्य विकसित करावे. ज्यामुळे स्थानिक पातळीवरच नव्हे तर मोठ्या पातळीवरही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

Web Title: Prime minister narendra modi will inaugurate acharya chanakya skill development centres tomorrow read about skill development centre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2024 | 06:29 PM

Topics:  

  • maharashtra
  • narendra modi
  • Nashik
  • prime minister

संबंधित बातम्या

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
1

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
2

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
3

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
4

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.