Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रोजेक्ट मुंबईकडून झिरो वेस्ट स्कूल्स सस्टेनेबिलिटी 2025 मेळाव्याचे आयोजन

प्रोजेक्ट मुंबईकडून झिरो वेस्ट स्कूल्स सस्टेनेबिलिटी मेळावा 2025 चे आयोजन 5 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले होते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 05, 2025 | 09:56 PM
प्रोजेक्ट मुंबईकडून झिरो वेस्ट स्कूल्स सस्टेनेबिलिटी 2025 मेळाव्याचे आयोजन

प्रोजेक्ट मुंबईकडून झिरो वेस्ट स्कूल्स सस्टेनेबिलिटी 2025 मेळाव्याचे आयोजन

Follow Us
Close
Follow Us:
  • झिरो वेस्ट स्कूल्स सस्टेनेबिलिटी 2025 मेळाव्याचे आयोजन
  • ३० हून अधिक शाळा, शिक्षक, नागरी नेत्यांचा सहभाग
प्रोजेक्ट मुंबईने शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५ रोजी झिरो वेस्ट स्कूल्स सस्टेनेबिलिटी मेळावा २०२५ चे आयोजन केले. ‘होप इन ॲक्शन: युथ फॉर ए क्लायमेट-रेझिलिएंट मुंबई’ या शीर्षकाखाली आयोजित या वैविध्यपूर्ण, युवा-केंद्रित हवामान कृती महोत्सवात ३० हून अधिक शाळा, शिक्षक, नागरी नेते, पर्यावरणवादी आणि शेकडो विद्यार्थी परिवर्तनकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वर्गातील हवामान उपक्रम आणि आगामी मुंबई क्लायमेट वीक २०२६ यांच्यात पूल निर्माण करण्यासाठी डिझाइन केलेल्या या मेळाव्याने प्रत्यक्ष शाश्वत प्रयत्नांमुळे नागरी वर्तणुकीत बदल घडवता येतो, हे अधोरेखित केले.

कार्यक्रमाची सुरुवात ‘झिरो वेस्ट स्कूल्स’ फिल्मच्या स्क्रिनिंगने, दीपप्रज्वलनाने आणि हवामान व शाश्वतता क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मान्यवरांच्या स्वागताने झाली. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित माझी वसुंधरा अभियानाचे मिशन संचालक सुधाकर बोबडे यांनी चार दशकांपासूनची सार्वजनिक सेवा आणि हवामान-प्रतिक्रिया प्रशासनातील त्यांच्या योगदानाविषयी माहिती दिली. प्रोजेक्ट मुंबई आणि मुंबई क्लायमेट वीकचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी नागरिकांच्या हवामान कृतीचे महत्त्व स्पष्ट केले. चिल्ड्रन्स अकॅडमीचे रोनित भट यांनी शाळांमध्ये अनुभवात्मक, शाश्वतता-केंद्रित शिक्षणाची गरज व्यक्त केली, तर झिरो वेस्ट स्कूल्सचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी आणि मरीन बायोलॉजिस्ट कोणार्क बोरकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा आणि हवामान जबाबदारी विकसित करण्यावर भर दिला. दोन तरुण विद्यार्थी चॅम्पियन्सनी मंचावर विद्यार्थी-केंद्रित हवामान नेतृत्त्वाचे प्रतिनिधित्व केले.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात संविधान तसेच एड्स जनजागरण अभियान! स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मेळाव्याची खासियत म्हणजे सस्टेनेबल गिफ्ट रॅपिंग, ग्रीन रिडिंग आणि प्लास्टिक-फ्री डेकॉर या तीन प्रत्यक्ष कार्यशाळांचे एकाचवेळी आयोजन. यासोबत प्रदर्शन झोनही होता, जिथे विद्यार्थ्यांनी दहा परस्परसंवादी शाश्वतता गेम स्टॉल्स, चक्रिय अर्थव्यवस्थेची प्रदर्शने, एनजीओ बूथ्स आणि प्रोजेक्ट मुंबईचे कंपोस्टिंग, रिसायकलिंग, अपसायकलिंग व लो-वेस्ट लिव्हिंगच्या प्रात्यक्षिके पाहिली. या अनुभवातून त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून शिकल्यास शाश्वततेची उद्दिष्टे सहज गाठता येतात, हे जाणले.

दुपारच्या सत्रात युनिसेफ इंडियाचे वॉश CCES स्पेशलिस्ट युसुफ कबीर यांनी प्रेरणादायी मुख्य भाषण केले. त्यानंतर तरुण पर्यावरणवादी राहुल बागवे यांच्या सूत्रसंचालनाखाली लेव्हल २ शाळांच्या विद्यार्थ्यांसह पॅनेल चर्चा झाली, ज्यात हवामान उपक्रमांशी निगडित आव्हाने आणि संधींवर संवाद झाला.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे यूएन एन्व्हायरन्मेंट गुडविल ॲम्बेसेडर अभिनेत्री दिया मिर्झा यांनी तरुणांसोबत केलेली प्रेरणादायी चर्चा. हवामान जबाबदारीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी तरुण हे केवळ भविष्य नसून ‘आजचे नेतृत्व’ असल्याचे सांगितले.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी जाहीर! ‘ही’ आहे दावे-हरकती दाखल करण्याची मुदत

पुरस्कार सोहळ्यात ९ लेव्हल २ शाळा, २० लेव्हल १ शाळा आणि विलक्षण कटिबद्धता दाखवणाऱ्या २० फॅसिलिटेटर्सना गौरवण्यात आले. कंपोस्टिंग, कचरा विलगीकरण, प्लास्टिक पुनर्वापर आणि विद्यार्थी-केंद्रित हवामान उपक्रमांद्वारे शाळा झिरो-वेस्ट झोन्समध्ये रूपांतरित होत असल्याचा विश्वास या पुरस्कारांनी व्यक्त केला.

सस्टेनेबिलिटी मेळा २०२५ हा विद्यार्थी, शिक्षक, नागरी अधिकारी आणि सामुदायिक सहयोगी यांच्यातील उत्तम टीमवर्कचे उदाहरण ठरला. सामुदायिक कंपोस्टिंग, प्लास्टिक कमी करण्याच्या मोहीमा आणि चक्रिय अर्थव्यवस्थेचे उपाय यांसारख्या उपक्रमांवर प्रकाश टाकत, या कार्यक्रमाने शालेय स्तरावरील कृती आणि शहरातील हवामान स्थिरता यांना जोडणारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. विद्यार्थी नेतृत्व केल्यास शहर प्रगतीकडे वाटचाल करते, हा ठोस संदेश मेळाव्यातून देण्यात आला.

शेवटी, स्वच्छ, हरित आणि शून्य-कचरा मुंबईच्या दिशेने चाललेल्या या चळवळीत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले. अधिक माहितीसाठी किंवा स्वयंसेवक/सहयोगी म्हणून जोडण्यासाठी info@projectmumbai.org या ईमेलवर किंवा ९६५३३ ३०७१२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: Project mumbai organizes zero waste schools sustainability 2025 meet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 09:56 PM

Topics:  

  • environment
  • Mumbai News

संबंधित बातम्या

राज्यात दहावीचे 16 तर बारावीचे 15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा; शिक्षण मंडळाची तयारी पूर्ण
1

राज्यात दहावीचे 16 तर बारावीचे 15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा; शिक्षण मंडळाची तयारी पूर्ण

Mumbai News: शहर विद्रूप करणाऱ्यांवर थेट अ‍ॅक्शन! मुंबईत ४१ बॅनर्सवर कारवाई, ३ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल
2

Mumbai News: शहर विद्रूप करणाऱ्यांवर थेट अ‍ॅक्शन! मुंबईत ४१ बॅनर्सवर कारवाई, ३ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम
3

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

शेतकरी कर्जमाफीवर कृषिमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा; शेतकऱ्यांना सरसकट लाभ मिळणार, 30 मार्चपूर्वी…
4

शेतकरी कर्जमाफीवर कृषिमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा; शेतकऱ्यांना सरसकट लाभ मिळणार, 30 मार्चपूर्वी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.