Ambadas Danve Allegations: समृद्धी महामार्गात १,१५० कोटी रुपयांचा घोटाळा! अंबादास दानवेंचा खासदार भुमरेंवर आरोप
Ambadas Danve Allegations On Sandipan Bhumre: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग सातत्याने अपघाताच्या घटनांमुळे चर्चेत असतो. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे खासदार संदिपान भुमरे यांच्यावर समृद्धी महामार्गात ११५० कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अंबादास दानवे यांच्या आरोपांवरून एकच खळबळ उडाली आहे.
सरकारी खजिना लुटण्यासाठी ११५० कोटींचा मोठा घोटाळा करण्यात आला, यात खासदारांच्या चालकांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. महाराष्ट्र विकास मंडळाने छत्रपती संभाजीनगर मधील जटवाडा भागातील २३ एकर आणि ३० गुंठे जमीन खरेदी केली होती. (Samruddhi Mahamarg)
पुण्यातील राजकीय हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक; शिष्टमंडळाची पोलिस आयुक्तांसोबत चर्चा
समृद्धी महामार्गासाठी ही जमीन खरेदी करण्याचा आदेश देण्यात आले होते. या जमिनीची किंमत १,१५० कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. सुरुवातीला या जमिनीचे कोणतेही कायदेशीर वारस समोर आले नव्हते. पण एवढी मोठी रक्कम मिळणार असल्याचे स्पष्ट होताच काही लोकांनी अचानक जमिनीवर मालकी हक्क सांगण्यास आणि पैसे मागण्यास सुरुवात केली. (Financial Scam)
अंबादास दानवे यांनी या प्रकरणात धक्कादायक पुरावे सादर केले आहेत. या जमिनीसाठी हिबानामा (दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन हस्तांतरित करण्याची मुस्लिम प्रथा) जावेद रसूल शेख नावाच्या व्यक्तीच्या नावावर करण्यात आला होता. कागदपत्रांनुसार, हा हिबानामा १९७१ मध्ये राबवण्यात आला होता. जावेद या व्यक्तीच्या नावावर हा व्यवहार झाला, त्याचा जन्म १९८५ मध्ये झाला होत. मग एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या १४ वर्षांपूर्वी जमीन एखाद्या व्यक्तीच्या नावावर कशी असू शकते, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.
वाहतूक कोंडीतून होणार सुटका! दहिसर पथकर नाका येथे सॅटेलाइट शुल्कवसुली यंत्रणा उभारणार
अंबादास दानवे यांच्या मते, ज्यांच्या नावाने हा कोट्यवधींचा व्यवहार झाला तो जावेद हा खासदार संदीपान भुमरे यांच्या वाहनाचा चालक होता. यापूर्वी या चालकाच्या नावावर ४०० कोटी रुपयांच्या कराराचे प्रकरण समोर आले होते. खासदार भुमरे यांनी समृद्धी महामार्गाच्या या जमिनीवरही मोठी कारवाई केली आहे, चालकाच्या नावावर असलेले ११५० कोटी रुपये हडप करण्याचा कट रचला आहे. मृत व्यक्तीच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी निधी हडप करण्याचा हा प्रयत्न आहे.






