आयबीपीएसअंतर्गत 896 रिक्त जागांसाठी मोठी भरती; 'ही' आहे अर्जासाठी शेवटची मुदत!
बँकिंग कार्मिक निवड संस्था (आयबीपीएस) अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी पदांच्या एकूण 896 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 असणार आहे.
संस्था : बँकिंग कार्मिक निवड संस्था (आयबीपीएस)
भरली जाणारी पदे
1. आयटी अधिकारी
2. कृषी क्षेत्र अधिकारी
3. राजभाषा अधिकारी
4. कायदा अधिकारी
5. एचआर/कार्मिक अधिकारी
6. विपणन अधिकारी
हेही वाचा : भारतीय सागरी विद्यापिठात ‘या’ पदासाठी भरती; भरल्या जाणार इतक्या जागा, आत्ताच करा अर्ज!
एकूण रिक्त पद संख्या : 896 पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024
वयोमर्यादा : 20 ते 30 वर्षे
किती आहे अर्जाचे शुल्क?
1. SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 175 रुपये (जीएसटीसह)
2. इतर सर्वांसाठी 850 रुपये (जीएसटीसह)
भरतीचा तपशील
आयटी अधिकारी : 170 जागा रिक्त
कृषी क्षेत्र अधिकारी : 346 जागा रिक्त
राजभाषा अधिकारी : 25 जागा रिक्त
कायदा अधिकारी : 125 जागा रिक्त
एचआर/कार्मिक अधिकारी : 25 जागा रिक्त
विपणन अधिकारी : 205 जागा रिक्त
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
– आयटी अधिकारी : ४ वर्षांची अभियांत्रिकी/तंत्रज्ञान शाखेतील पोस्ट ग्रॅज्युएट पदवी.
– कृषी क्षेत्र अधिकारी : ४ वर्षांची अभियांत्रिकी पदवी.
– राजभाषा अधिकारी : पदव्युत्तर पदवी
– कायदा अधिकारी : कायद्यातील बॅचलर पदवी (LLB) आणि बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली
– एचआर/कार्मिक अधिकारी : पदवीधर
– विपणन अधिकारी : पदवीधर
कसा कराल अर्ज?
बँकिंग कार्मिक निवड संस्था (आयबीपीएस) या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध सूचना काळजीपूर्वक वाचा. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 असणार आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा : https://www.ibps.in/wp-content/uploads/Detailed-Advt.-CRP-SPL-XIV_final-1.pdf
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : https://ibpsonline.ibps.in/crpsp14jul24/
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.ibps.in/ ला भेट द्या.