Management Quota Admission 2026-27: मॅनेजमेंट कोट्यात मनमानीला ब्रेक! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Management Quota Admission: मोठमोठ्या कोर्सला प्रवेश घेताना सर्वात जास्त गोंधळ होतो. आधी मुलांच्या प्रवेशांच्या याद्या लागतात. मात्र एक जागा ही विशेष कोट्यासाठी ठेवली जाते त्याला आपण म्हणतो मॅनेजमेंट कोटा. या कोट्यामध्ये कॉलेज कमी गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्याना अगदी सहज घेतात. काहीतर विद्यार्थ्यांकडून भरघोस पैसे घेऊन त्या जागा विकतात. त्यामुळे जो विद्यार्थी ती जागा मिळवण्यासाठी खरा प्राप्त असतो तो मात्र मागे राहतो. आता मात्र यावर्षीपासून हा मॅनेजमेंटचा खेळ बंद होणार आहे. सीईटी सेल (CET Cell) म्हणजे ‘राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष’ (State Common Entrance Test Cell) या कक्षाने कडक पावले उचलली आहेत.
2026-27 या वर्षापासून संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियेवर म्हणजेच Institutional Quota वर सरकार थेट वॉच ठेवणार. आता कॉलेजमध्ये सरकारी निरीक्षक बसणार CET Cell चे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी याबाबत एक परिपत्रक जाहीर केलं आहे. यानुसार ज्या खासगी कॉलेजमध्ये संस्थास्तरीय प्रवेश होईल तिथे निवडक कॉलेजमध्ये निरीक्षक नेमले जातील. Management Quota Admission 2026-27:
त्या विभागाच्या सरकारी कॉलेजचे प्राचार्य, संचालक किंवा सिनियर प्रोफेसर असतील. हे शिक्षक रोज कॉलेजमध्ये बसून पूर्ण प्रवेश प्रक्रिया बघणार तसेच कागदपत्रं तपासणं, मेरीट लिस्ट बनवणं, फी भरणं आणि जागा वाटप या सर्व गोष्टीवर त्यांची नजर असेल. रोज काम दिवस संपल्यावर त्यांना काय झालं याचा रिपोर्ट वर पाठवावा लागणार आहे.
आता कॉलेजला मनमानी कारभार करता येणार नाही. ज्या खोलीत कागदपत्र पडताळणी आणि जागा वाटप होईल त्या खोलीत CCTV असणं बंधनकारक असेल. फक्त CCTV नाहीतर त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग पण सुरक्षित ठेवावं लागेल. कोणत्याही विद्यार्थ्यांनी तक्रार केली असता,ते रेकॉर्डिंग CET Cell ला द्यावं लागेल. त्यामुळे मागच्या दाराने ॲडमिशनचा प्रकार बंद होईल.






