फोटो सौजन्य - Social Media
पावर ग्रीडमध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून ७१ रिक्त जागांसाठी भरतीची प्रक्रिया आयोजली जाणार आहे. ऑफिसर ट्रेनीच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पावर ग्रीडच्या powergrid.in या अधिकृत संकेस्थळाला भेट द्यावी. ४ डिसेंबर २०२४ पासून या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक २४ डिसेंबर २०२४ आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी शेवटची दिनांक लक्षात ठेवून अर्ज करावे. वेळे नंतर करण्यात आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
मुळात, या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करताना काही रक्कमांची अर्ज शुल्क म्हणून भरपाई करावी लागणार आहे. सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज करताना ५०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तसेच OBC आणि EWS क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तसेच इतर आरक्षित वर्ग जसे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच PwBD/ Ex-SM प्रवर्गातील उकमेद्वारांना अगदी निशुल्क अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना काही अटी शर्तीना पात्र करावे लागणार आहे. या अटी शर्ती उमेदवाराच्या शिक्षण संदर्भात आहेत, तसेच वयोमर्यादे संदर्भांत आहेत.
विविध पदासाठी अटी शर्ती वेगवेगळ्या आहेत. पर्यावरण व्यवस्थापन पदासाठी अर्ज करता उमेदवार पर्यावरण शास्त्र/ नैतिक संसाधन व्यवस्थापन/ पर्यावरण अभियांत्रिकी किंवा समकक्ष विषयात पहिल्या श्रेणीत पदव्युत्तर हवा. तसेच सामाजिक व्यवस्थापन पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यात पहिल्या श्रेणीत पदव्युत्तर हवा. मानव संसाधन/ कार्मिक व्यवस्थापन/ औद्योगिक संबंधामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री/ डिप्लोमा/ एमबीए असणारे उमेदवार मानव संसाधन विभागातील रिक्त जागांसाठी अर्ज करू शकतात. किमान ६०% गुणांनी पत्रकारितेत पदव्युत्तर उमेदवार सार्वजानिक संबंध विभागात कार्यशील होऊ शकतात. अधिसूचनेमध्ये या अटी शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत. अधिसूचनेमध्ये नमूद असलेल्या वयोमर्यादे संदर्भात अटीनुसार, जास्तीत जास्त २८ वर्षे आयु असलेला उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत अधिकची सूट देण्यात येईल.
वय सवलत:
OBC (NCL): अधिक 3 वर्षे
SC/ST: अधिक 5 वर्षे
PwBD: अधिक 10 वर्षे