फोटो सौजन्य - Social Media
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. मुळात, या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्केल 1 अधिकारी म्हणजेच सहायक प्रबंधकाच्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजली गेली आहे. एकूण 110 रिक्त जागांसाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी GIC च्या gicre.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर हे लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
GIC च्या या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना 4 डिसेंबरपासून अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. उमेदवारांना डिसेंबरच्या 19 तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 110 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. जनरल पदासाठी 18 जागा, लीगल पदासाठी 9, HR च्या पदासाठी 6 जागा, इंजिनिअरिंगसाठी 5 तर IT पदासाठी 22 जागा रिक्त आहेत. तर उर्वरित रिक्त जागांमध्ये Actuary च्या 10 जागा, इन्श्योरन्सच्या 20 जागा, मेडिकल MBBS च्या 2 तर फायांनासच्या 18 जागांचा समावेश आहे.
तसेच या भरतीच्या प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. किमान 21 वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त 30 वर्षे असलेल्या उमेदवार त्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
चयन (वैद्यकीय (एमबीबीएस) वगळता सर्व विषयांसाठी) ऑनलाइन चाचणी, समूह चर्चा आणि मुलाखतीत केलेल्या प्रदर्शन आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारावर उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. ऑनलाइन चाचणी, समूह चर्चा आणि मुलाखतीसाठी एकूण 200 अंक असतील. ऑनलाइन चाचणी उत्तीर्ण करण्यासाठी सामान्य आणि ओबीसी उमेदवारांना किमान 60% आणि एससी/एसटी उमेदवारांना 50% अंक मिळवणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिसूचनेचा आढावा घ्या.
महत्वपूर्ण तारीखा