सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अंतर्गत 450 पदांवर भरती; 16 जुलैपासून सुरु होणार अर्जप्रक्रिया!
भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अंतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदासाठी भरती निघाली आहे. सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा विभागाकडून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘वैद्यकीय अधिकारी’ पदाची एकूण 450 रिक्त पदे भरली जाणार आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा
रिक्त असलेले पद : वैद्यकीय अधिकारी
रिक्त असलेली पद संख्या : 650 पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 16 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑगस्ट 2024
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता?
वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीची तारीख : 28 ऑगस्ट 2024
कसा कराल अर्ज?
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अंतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी’ या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2024 असणार आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा : https://drive.google.com/file/d/11hvx5GLIRjZdfBXq_NLDQUr4YJs7S14f/view
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : https://www.amcsscentry.gov.in/
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट www.amcsscentry.gov.in ला भेट द्या.