Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला

मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करून थेट पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यालाच फोन करीत मारहाणीची तक्रार तातडीने नोंदवून घेण्यासाठी दबाव टाकण्याचा धक्कादायक प्रकार छावणी पोलिस ठाण्यात घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 19, 2026 | 01:58 PM
CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करून थेट पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यालाच फोन करीत मारहाणीची तक्रार तातडीने नोंदवून घेण्यासाठी दबाव टाकण्याचा धक्कादायक प्रकार छावणी पोलिस ठाण्यात घडला. मात्र, तक्रार नोंदविताना पोलिसांना संशय आल्याने पडताळणी करण्यात आली आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या नावाचा वापर करून संपूर्ण बनाव रचल्याचे उघड झाले. याप्रकरणी आसीफ खान इस्माईल खान (रा. कुरेशी पार्क, मिटमिटा) आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

दरम्यान या प्रकरणानंतर आरोपी आसीफ खान हा पसार झाला होता. पोलिस आपल्या मागावर असल्याची कल्पना असल्याने तो मोबाइल बंद करुन पुण्याला पसार झाला होता. पोलिस त्याचा तपास करत असतांना दोन दिवसांपूर्वी आसीफने त्याचा मोबाइल सुरु केला. त्यामुळे पोलिसांना त्याचे लोकेशन भेटले. त्यानुसार, पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस करुन त्याला शुक्रवारी दिनांक १७ राञी बेड्या ठोकल्या, अशी माहिती सहायक निरीक्षक डॉ. विवेक जाधव यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै रोजी पहाटे ४.३९ वाजता छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक डॉ. विवेक जाधव यांच्या मोबाइलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. समोरील व्यक्तीने स्वतः मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत, मिटमिटा परिसरात पठाण नावाच्या व्यक्तीवर मोठा हल्ला झाल्याने त्याची तक्रार तातडीने नोंदवून घ्यावी, अशी सूचना केली. त्याचबरोबर आपण मुख्यमंत्री यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही उल्लेख करण्यात आला.

दरम्यान, जखमी अवस्थेतील आसीफ खान इस्माईल खान याला वैद्यकीय तपासणीनंतर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानेही आपण मुख्यमंत्री यांचे जवळचे असून अनेक वरिष्ठ अधिकारी आपल्या परिचयाचे असल्याचा दावा केला. त्यानुसार त्याच्या मारहाणीच्या तक्रारीची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तक्रार नोंदविताना आसीफ खानच्या बोलण्यात विसंगती जाणवू लागल्याने डॉ. जाधव यांनी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्याचा दावा करण्यात आलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, तो मोबाइल बंद होता. याबाबत विचारणा होताच आसीफ खान समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. काही वेळाने तब्येत बरी नसल्याचे कारण सांगून तो दवाखान्यातुन जावून येतो म्हणत ठाण्यातून निघून गेला.

पडताळणी करताच मोबाईल बंद, दोघांवर गुन्हा

पोलिसांनी दोन्ही मोबाइल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले असता ते छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतच बंद झाल्याचे समोर आले. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करून पोलिस प्रशासनाची फसवणूक केल्याचे समोर आले. प्रकरणात सहायक निरीक्षक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन छावणी पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सुर्यकांत शेबाले करित आहेत.

हे सुद्धा वाचा : नांदेडचे शिक्षक सुनील मोरे आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; आधी मुलांची धारदार शस्त्रांनी हत्या केली अन् नंतर…

संशय कशामुळे बळावला?

तक्रार नोंदविताना आसीफ खानने मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक असल्याचा वारंवार उल्लेख केला. त्याचवेळी मुख्यमंत्री कार्यालयातून आल्याचा दावा असलेल्या फोनची पडताळणी केली असता संबंधित मोबाइल बंद आढळला. यानंतर त्याच्या उत्तरांमध्येही विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला.

Web Title: The police have arrested a person who committed fraud by using the name of the chief ministers office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • fraud

संबंधित बातम्या

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त
1

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त

दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल
2

दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल…
3

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल…

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
4

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.