'या' वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी सॅमसंग इंडियाकडून ‘सॉल्व्ह फॉर टूमारो 2025' स्पर्धा जाहीर
भारतातील आघाडीचा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंग याने आपल्या प्रतिष्ठित ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ या उपक्रमाच्या चौथ्या आवृत्तीचे अनावरण केले आहे. हा देशव्यापी उपक्रम 14 ते 22 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना उद्देशून आहे आणि त्यांना सामाजिक व पर्यावरणीय समस्यांवर नवकल्पनांद्वारे उपाय शोधण्यासाठी प्रेरित करतो. यंदा 29 एप्रिल ते 30 जून 2025 कालावधीत अर्ज स्वीकारले जातील, आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांना 82000 तासांचे प्रशिक्षण व मेंटोरशिप मिळणार असून, यात डिझाईन थिंकिंग, प्रत्यक्ष प्रोटोटाइपिंग, बिझनेस प्लॅनिंग आणि मार्केट स्ट्रॅटेजीजचा समावेश आहे. सर्वोत्तम चार टीम्सना १ कोटी रुपयांचे इन्क्युबेशन अनुदान, टॉप 20 टीम्सना प्रत्येकी 20 लाख, तर टॉप 40 टीम्सना प्रत्येकी 8 लाख रुपयांचे प्रोत्साहन दिले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना सॅमसंग लीडर्स, IIT दिल्लीमधील तज्ज्ञ व गुंतवणूकदारांकडून सल्ला आणि मार्गदर्शन मिळणार आहे.
बारावीच्या पुढील टप्प्यावर ‘या’ क्षेत्रांत घडवा करिअर; संधी मोठ्या आणि भविष्य उज्ज्वल
या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन IIT दिल्लीमध्ये करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते, ज्यात भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि MEITY स्टार्टअप हबचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे CEO जेबी पार्क म्हणाले, “या उपक्रमाद्वारे आम्ही भारतातील युवा प्रतिभेला खऱ्या अर्थाने एक प्लॅटफॉर्म देत आहोत, ज्यातून ते आपल्या कल्पना व्यवहार्य आणि शाश्वत सोल्यूशन्समध्ये रूपांतरित करू शकतात.”
‘Beauty With Brain’ याचं उत्तम उदाहरण; देशात 116 व्या रँकने आशना झाली IPS अधिकारी
IIT दिल्लीचे संचालक प्रो. रंगन बॅनर्जी यांनी सांगितले की, “ही संधी विद्यार्थ्यांना संशोधन, नवप्रवर्तन व उद्योजकतेसाठी एक भक्कम आधार देईल.”
भारतासाठी ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ हा उपक्रम केवळ स्पर्धा नसून, एक व्यापक परिवर्तनाची सुरुवात आहे, जी युवकांना सक्षम करून विकसित भारत 2047 च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.