Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगलीत जिल्हा परिषद शाळांचा डंका! गुढीपाडव्याला ६०.९४% प्रवेश पूर्ण; तीन वर्षांत पटसंख्येत १० टक्क्यांची विक्रमी वाढ

सांगली जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या ६०.९४% प्रवेशांची नोंद. गुढीपाडव्याला ११,१४२ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश. वाळवा तालुका पिछाडीवर तर विटा-तासगाव आघाडीवर.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 19, 2026 | 08:28 PM
सांगलीत जिल्हा परिषद शाळांचा डंका!

सांगलीत जिल्हा परिषद शाळांचा डंका!

Follow Us
Follow Us:

 

  • सांगलीत जिल्हा परिषद शाळांचा डंका!
  • गुढीपाडव्याला ६०.९४% प्रवेश पूर्ण
  • तीन वर्षांत पटसंख्येत १० टक्क्यांची विक्रमी वाढ
प्रविण शिंदे, सांगली : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगली जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण क्षेत्रात आशादायी चित्र पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशोत्सवात एकूण १८,२८१ दाखल पात्र विद्यार्थ्यांपैकी ११,१४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, ही टक्केवारी ६०.९४ इतकी नोंदली गेली आहे. मराठी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा वाढता ओढा या निमित्ताने अधोरेखित झाला आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने ‘माझी शाळा आदर्श शाळा’ या उपक्रमांतर्गत यंदाचा प्रवेशोत्सव अधिक आकर्षक व विद्यार्थीकेंद्री केला. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये चिमुकल्यांचे औक्षण, पाटीपूजन, पुस्तकांची गुढी, सरस्वती पूजन, तसेच फुले-फुगे देऊन स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या ‘पहिल्या पावलांचे ठसे’ घेऊन संस्मरणीय क्षण नोंदवण्यात आले.

“जिल्हा परिषद शाळा या केवळ शिक्षण देणाऱ्या संस्था नसून मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचा मजबूत पाया आहेत. तज्ज्ञ शिक्षक, डिजिटल साधने, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांगीण विकास यावर आमचा भर आहे. पालकांनी जिल्हा परिषद शाळांवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांचा प्रवेश येथे निश्चित करावा,”
– मुख्य कार्यकारी अधिकारी, विशाल नरवाडे
“नवीन विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन उद्यापासून सुरू होणार आहे. १ मेपर्यंत सातत्याने मार्गदर्शन केले जाणार असून अंगणवाडी सेविका व शिक्षक यांचा समन्वय साधून हा उपक्रम राबवला जात आहे. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढेल, असा विश्वास आहे. पुढील आठवडाभर प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे,”
– मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी

प्रतिसाद असा

विटा, तासगाव, कडेगाव आणि शिराळा या तालुक्यांनी प्रवेशोत्सवात आघाडी घेतली असून या भागात पालकांचा जिल्हा परिषद शाळांकडे अधिक विश्वास दिसून आला.आटपाडी, जत आणि मिरज या तालुक्यांमध्ये सरासरी प्रतिसाद मिळाला असून या ठिकाणी प्रवेश वाढीसाठी अजून प्रयत्नांची गरज आहे.पलूस, कवठेमहांकाळ आणि वाळवा या तालुक्यांमध्ये तुलनेने कमी प्रतिसाद नोंदला गेला. विशेषतः वाळवा तालुका सर्वात कमी प्रतिसाद असलेला ठरला.

Sangli Politics: सांगलीत ‘ऑपरेशन लोटस’ फसले; अफवांना पूर्णविराम, रोहित पाटील गट ठामपणे महाविकास आघाडीसोबत

वाढता विश्वास, वाढती टक्केवारी

  • २०२४-२५ : ५१.४०%
  • २०२५-२६ : ५४.३४%
  • २०२६-२७ : ६०.९४%
  • तीन वर्षांत तब्बल १०% वाढ
जिल्हा परिषद शाळांची वैशिष्ट्ये
  • तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक
  • ई-लर्निंग, डिजिटल क्लासरूम
  • मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व शालेय साहित्य
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
  • क्रीडा, सांस्कृतिक व कौशल्य विकास उपक्रम
  • सुरक्षित वातावरण व CCTV सुविधा
  • RO पाणी, स्वच्छ शौचालये
  • हरित व आनंददायी शाळा परिसर

‘प्रवेशोत्सव’ची वैशिष्ट्ये

  • वाजत-गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत
  • पाटीपूजन व सरस्वती पूजन
  • पुस्तकांची गुढी उभारणी
  • फुले-फुगे देऊन स्वागत
  • ‘पहिल्या पावलांचे ठसे’ उपक्रम
  • पालक जनजागृती अभियान
एकूणच, सांगली जिल्ह्यातील गुढीपाडवा प्रवेशोत्सवाने मराठी माध्यमाच्या शिक्षणाला नवसंजीवनी दिली असून, जिल्हा परिषद शाळांवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Sangli News: ‘पीएम सूर्य घर’ योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा; खासदार विशाल पाटील यांचे महावितरणला निर्देश

Web Title: Sangli district council schools make waves 6094 admissions completed by gudi padwa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 08:28 PM

Topics:  

  • Career News
  • Sangli
  • sangli news

संबंधित बातम्या

How to Become An Air Hostess: एअर होस्टेस बनायचंय? डिग्रीपासून ट्रेनिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण मार्ग
1

How to Become An Air Hostess: एअर होस्टेस बनायचंय? डिग्रीपासून ट्रेनिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण मार्ग

JPSC-JSSC वादाचा भडका! विद्यार्थी संतप्त का झाले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2

JPSC-JSSC वादाचा भडका! विद्यार्थी संतप्त का झाले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सांगलीत रंगणार ‘विश्वजित मराठी सेलिब्रिटी Cricket League’; ‘या’ तारखेला रंगणार ‘VMPL’चा महासंग्राम
3

सांगलीत रंगणार ‘विश्वजित मराठी सेलिब्रिटी Cricket League’; ‘या’ तारखेला रंगणार ‘VMPL’चा महासंग्राम

CSC Aadhaar: 12 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी; 7 राज्यांमध्ये 312 पदांवर सीएससी भरती, 20 ऑगस्टपूर्वी असा करा अर्ज
4

CSC Aadhaar: 12 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी; 7 राज्यांमध्ये 312 पदांवर सीएससी भरती, 20 ऑगस्टपूर्वी असा करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.