Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pinewood School Panchgani: पाचगणीतील ‘पाईनवुड स्कूल’ची मान्यता का रद्द होणार? शिक्षणाधिकाऱ्यांच्या धडक शिफारशीचे कारण काय?

School Panchgani:पाचगणी येथील पाईनवुड इंटरनॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची मान्यता रद्द करण्यासाठी सातारा माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी स्वयंस्पष्ट शिफारस पाठवली आहे. मुख्याध्यापकांचा मनमानी कारभार आणि नियमांचे उल्लंघन ठरले कारण.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 19, 2026 | 05:38 PM
pinewoods

pinewoods

Follow Us
Follow Us:

Pinewood School Panchgani:  पर्यटन आणि दर्जेदार शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी येथील ‘पाईनवुड इंटरनॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज’ प्रशासन सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाच्या मनमानी व नियमबाह्य कारभारामुळे या शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.

सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी या शाळेची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (कोल्हापूर विभागीय मंडळ) कडील मान्यता काढून घेण्यासाठी शिक्षण उपसंचालकांकडे ‘स्वयंस्पष्ट शिफारस’ पाठवली आहे. त्यामुळे या नामांकित शाळेची मान्यता आता अंतिम टप्प्यात रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

पालक आणि शिक्षकांच्या तक्रारींनंतर चौकशीचा फेरा

या कारवाईची कारणे मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या वादात आहेत. पाईनवुड स्कूलमधील सहायक शिक्षक आणि तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्याध्यापकांविरोधात गंभीर स्वरूपाच्या लेखी तक्रारी शिक्षण विभाग आणि पाचगणी पोलीस ठाण्यात दाखल केले होते. या तक्रारींची दखल घेत पाचगणी पोलिसांनीही शाळेच्या एकूण कामकाजाची शासकीय चौकशी करण्याची विनंती शिक्षण विभागाला पत्राद्वारे केली होती.

Scholarship Result: ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर! गुण पडताळणी आणि दुरुस्तीची शेवटची तारीख माहितीये का?

मिळालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने उपशिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त समितीने शाळेला अचानक भेट देऊन चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्या . शाळेला मंजुरी देताना शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे सर्रास उल्लंघन व्यवस्थापनाकडून केले जात असल्याचे सिद्ध झाले . त्यानुसार ‘महाराष्ट्र स्वयं-अर्थसहाय्यित शाळा (स्थापना आणि नियमन) कायदा २०१२’ मधील कलम १४ अन्वये या शाळेची आय.सी.एस.ई. (ICSE) आणि राज्य मंडळाची मान्यता काढून घेण्याची शिफारस करण्यात आली.

१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे दाखले रोखले; पालकांमध्ये संताप

शाळेच्या मुख्याध्यापकांचा मनमानी कारभार एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यांनी इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले (LC) देण्यास नकार दिल्याच्या नवीन तक्रारी पालकांकडून प्राप्त झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने दखल घेतली. शिक्षणाधिकाऱ्यांनी याप्रकरणी घेतलेल्या सुनावणीत आणि पाठवलेल्या नोटीसांना शाळेकडून योग्य उत्तरे दिली गेली नाहीत, तसेच काही शासकीय पत्रे स्वीकारण्यासही मुख्याध्यापकांनी नकार दिला होता.

MHT-CET 2026: सीईटी परीक्षेत खरोखरच घोटाळा झालाय का? ‘त्या’ व्हायरल गुणवत्ता यादीमागचे सत्य काय?

कोल्हापूर विभागीय मंडळाकडून कडक पावले

या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षणाधिकारी, सातारा यांनी कोल्हापूर विभागीय मंडळाच्या सचिवांकडे शाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर कोल्हापूर विभागीय मंडळाच्या सचिवांनी शिक्षण उपसंचालक (कोल्हापूर विभाग) यांना या प्रकरणाचा ‘स्वयंस्पष्ट शिफारशीसह’ अंतिम प्रस्ताव तात्काळ मंडळाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सातारा शिक्षण विभागाने आपला अंतिम अहवाल उपसंचालकांकडे सुपूर्द केला आहे.
शिक्षण विभागाच्या या धडक कारवाईमुळे पाचगणीतील शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. पालकांच्या आणि शिक्षकांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या आणि शासकीय नियमांना हरताळ फासणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागाने घेतलेल्या या कठोर भूमिकेचे जागरूक पालकांकडून स्वागत होत आहे. आता कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळ यावर कधी अंतिम शिक्कामोर्तब करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Satara panchgani pinewood school recognition cancellation proposal education officer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • education
  • Satara

संबंधित बातम्या

DIKSHA Portal: डिजिटल शिक्षणाचे वरदान! पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘या’ प्लॅटफॉर्मचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व’
1

DIKSHA Portal: डिजिटल शिक्षणाचे वरदान! पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘या’ प्लॅटफॉर्मचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व’

NDRF जवानांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘प्रोजेक्ट निर्मल’; जवानांसह कुटुंबीयांनाही मिळणार आधार
2

NDRF जवानांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘प्रोजेक्ट निर्मल’; जवानांसह कुटुंबीयांनाही मिळणार आधार

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित
3

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
4

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.