फोटो सौजन्य- सोशल मीडिया
MSCE Scholarship Result 2026: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) या वर्षाच्या सुरुवातीला घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता ८ वी) परीक्षेचा तात्पुरता निकाल जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती, ते आता परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतात.
इयत्ता ५ वी आणि ८ वीसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभरात घेण्यात आली होती. या शिष्यवृत्तीच्या निकालासोबतच परिषदेने विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेचाही तात्पुरता निकाल जाहीर केला आहे.
UGC NET June 2026 साठी अर्ज केलाय का? आजच संपतेय शेवटची संधी, पाहा संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया!
परीक्षा परिषदेने म्हंटले आहे की, ऑनलाइन गुण पडताळणी अर्जांविषयीचा निर्णय अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत संबंधित शाळेच्या लॉगिन पोर्टलवर कळवला जाईल. तसेच संपूर्ण अर्जांची पडताळणी आणि तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी (Merit List) प्रसिद्ध करण्यात येईल. गुण पडताळणीव्यतिरिक्त शाळांना विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक तपशीलात 27 मे 2026 पर्यंत ऑनलाइन दुरूस्ती करता येणार आहे.






