Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education News: CET परीक्षेतील प्रश्नांवर व उत्तरांवर आक्षेप नोंदविण्याचे वेळापत्रक जाहीर

वेळापत्रकानुसार प्रश्नपत्रिका, उमेदवारांनी दिलेले उत्तर आणि अचूक उत्तर विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. शेवटच्या तारखेनंतर सीईटीचा आक्षेप ट्रॅकर बंद होईल.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 29, 2026 | 10:21 PM
Education News: CET परीक्षेतील प्रश्नांवर व उत्तरांवर आक्षेप नोंदविण्याचे वेळापत्रक जाहीर
Follow Us
Follow Us:

सीईटी परीक्षेतील प्रश्नांवर व उत्तरांवर आक्षेप नोंदविण्याचे वेळापत्रक जाहीर
विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये ऑब्जेक्शन ट्रॅकर उपलब्ध
अचूक उत्तर विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले जाणार

मुंबई/नीता परब:  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या गेलेल्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तंत्र शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या एमसीए व एम. एचएमसीटी (CET) या दोन अभ्यासक्रमाच्या व उच्च शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या एमपीएड, एमएड, ३ वर्षीय एलएलबी, बीपीएड, बीएड-एमएड ( ३ वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) व बीएड या सहा अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा झाल्या आहेत. या सीईटीच्या प्रवेश परीक्षेतील प्रश्नांवर आणि उत्तरांवर आक्षेप (Career) नोंदविण्याचे वेळापत्रक सीईटी कक्षाने जाहीर केले आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे मार्च व एप्रिल २०२६ मध्ये तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या एम.एचएमसीटीची प्रवेश परीक्षा २५ मार्च २०२६ व एमसीएची प्रवेश परीक्षा ३० मार्च २०२६ झाली व उच्च शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या एमपीएडची प्रवेश परीक्षा २४ मार्च २०२६ , एमएडची प्रवेश परीक्षा २५ मार्च २०२६, बीएडची प्रवेश परीक्षा २७ मार्च ते २९ मार्च २०२६ , ३ वर्षीय एलएलबीची प्रवेश परीक्षा १ व २ एप्रिल २०२६, बीपीएडची प्रवेश परीक्षा ४ एप्रिल २०२६ व बीएड-एमएडची ( ३ वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) प्रवेश परीक्षा ९ एप्रिल २०२६ रोजी झाल्या.

सीईटी कक्षाकडून दुसऱ्या संधीच्या सीईटीच्या तारखा जाहीर! दुसऱ्या संधीची CET कधी होणार?

विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये ऑब्जेक्शन ट्रॅकर उपलब्ध
या संबंधित सीईटी प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये ऑब्जेक्शन ट्रॅकर उपलब्ध करून दिला जाईल. जेणेकरून त्यांना सीईटी प्रवेश परीक्षेत दिलेल्या प्रश्नांवर आणि उत्तरांवर आक्षेप नोंदवता येईल. विविध सीईटीच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑब्जेक्शन ट्रॅकरचे वेळापत्रक देण्यात अाले अाहे.

सीईटीच्या प्रश्नांवर व उत्तरांवर आक्षेप नोंदविण्याचे वेळापत्रक
एम.एचएमसीटी व एमसीए
सुरुवातीची तारीख : ३० एप्रिल २०२६
शेवटची तारीख: २ मे २०२६

एमपीएड, एमएड, ३ वर्षीय एलएलबी,
बीपीएड, बीएड-एमएड
( ३ वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम)
सुरुवातीची तारीख : १ मे २०२६
शेवटची तारीख: ३ मे २०२६

बीएड
सुरुवातीची तारीख : ३ मे २०२६
शेवटची तारीख : ५ मे २०२६

CET Exam 2026: व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी उद्यापासून ‘CET’चा रणसंग्राम; ७१ हजार विद्यार्थी नशीब आजमावणार

वरील वेळापत्रकानुसार प्रश्नपत्रिका, उमेदवारांनी दिलेले उत्तर आणि अचूक उत्तर विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. शेवटच्या तारखेनंतर सीईटीचा आक्षेप ट्रॅकर बंद होईल. जर एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका किंवा ‘उत्तर की’ मधील कोणत्याही प्रश्नावर आक्षेप असेल तर वरील परीक्षेसाठी आक्षेप ट्रॅकिंग पर्यायाद्वारे आक्षेप नोंदवू शकतो, वरील वेळापत्रकानुसार विद्यार्थ्याला त्याच्या लॉगिनद्वारेच आक्षेप सादर करता येईल. विद्यार्थ्याला प्रती प्रश्न/प्रती आक्षेपासाठी लागणारी रक्कम ऑनलाईन लॉगिनद्वारे भरावी लागणार असल्याचे कळविण्यात अाले अाहे. ई-मेलद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले प्रश्न आणि उत्तरांसंबंधीचे निवेदन/तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत. तरी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार जर सीईटी प्रवेश परीक्षेतील प्रश्नांवर आणि उत्तरांवर काही आक्षेप असतील तर ते या ऑब्जेक्शन ट्रॅकरद्वारे नोंदवावेत असे आवाहन सीईटी कक्षानी केले आहे.

Web Title: Schedule raising objections to questions and answers in the cet exam announcedcarrer news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 10:19 PM

Topics:  

  • Career News
  • CET
  • CET Exam
  • Students

संबंधित बातम्या

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी
1

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
2

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!
3

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
4

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.