Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूर येथे बारावीच्या रसायनशास्त्र पेपरफुटीची गंभीर घटना उघडकीस! Whatsapp वर प्रश्नपत्रिका लीक

नागपूर येथे बारावीच्या रसायनशास्त्र पेपरफुटीची गंभीर घटना उघडकीस आली. व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे समोर आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 22, 2026 | 03:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच नागपूर येथे बारावीच्या पेपरफुटीची गंभीर घटना उघडकीस आली आहे. विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र (केमिस्ट्री) विषयाचा पेपर परीक्षेच्या एक तास आधीच व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Washim News : परीक्षेच्या सीसीटीव्ही फुटेजचे जतन करा! मंडळाकडून क्षेत्रीय अधिकारी व परीक्षा केंद्र संचालकांना निर्देश

ही घटना सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर उघडकीस आली. एका विद्यार्थिनीच्या संशयास्पद हालचालीमुळे पर्यवेक्षकांनी तपास केला असता तिच्याकडे स्मार्टफोन सापडला. फोन तपासल्यानंतर प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे आधीच शेअर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या ग्रुपमध्ये सुमारे १५ विद्यार्थी सहभागी असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक चौकशीत एका खासगी ट्यूशन शिक्षकाने पैसे घेऊन पेपर लीक केल्याचा आरोप समोर आला आहे. याआधी भौतिकशास्त्र (फिजिक्स) विषयाचा पेपरही अशाच पद्धतीने व्हायरल झाल्याची चर्चा होती. त्यामुळे संपूर्ण परीक्षापद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या घटनेची दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

पुण्यातील धायरी परिसरातही एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत केल्याचा प्रकार समोर आला. शाळेचा निकाल १०० टक्के लागावा, या उद्देशाने हा प्रकार केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा अधोरेखित झाल्या आहेत. राज्यमंत्री भोयर यांनी नागपूरमधील श्री संताजी महाविद्यालय या परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवले जात असून कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. खासगी कोचिंग क्लास, शिक्षक किंवा संबंधित कोणताही घटक दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Washim News : गाडगेबाबांच्या दशसूत्रीचे पालन करा! सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन

दरम्यान, बीड जिल्ह्यातील एका प्रकरणात २४ जणांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच संभाजीनगर येथे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मंडप टाकून परीक्षा घेण्यास परवानगी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कॉपीच्या व्हिडिओंची सत्यता तपासली जात असून तथ्य आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. शालेय शिक्षण व गृह विभाग या प्रकरणावर संयुक्तपणे लक्ष ठेवून असून, परीक्षांची पारदर्शकता राखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत असून, शिक्षण व्यवस्थेवर विश्वास टिकवण्यासाठी प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Web Title: Serious incident of class 12 chemistry paper leak on whatsapp exposed in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Nagpur
  • neet paper leak
  • Paper Leak Case

संबंधित बातम्या

Maskarya Ganpati: गणेशोत्सव संपल्यानंतर पितृपक्षात विराजमान होतो मस्कऱ्या गणपती; काय आहे इतिहास
1

Maskarya Ganpati: गणेशोत्सव संपल्यानंतर पितृपक्षात विराजमान होतो मस्कऱ्या गणपती; काय आहे इतिहास

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी
2

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी

NEET UG Scam : नीट परीक्षा वादावर सर्वात मोठी अपडेट; मास्टरमाइंड्सचे चेहरे लवकरच उघड होणार?
3

NEET UG Scam : नीट परीक्षा वादावर सर्वात मोठी अपडेट; मास्टरमाइंड्सचे चेहरे लवकरच उघड होणार?

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! Mahindra अन् Embraer चा नागपुरात विमान जोडणी प्रकल्प; IAF ची मान्यता मिळताच कामाला वेग
4

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! Mahindra अन् Embraer चा नागपुरात विमान जोडणी प्रकल्प; IAF ची मान्यता मिळताच कामाला वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.