Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sex Education : शालेय अभ्यासक्रमात लवकरच ‘लैंगिक शिक्षण’ सुरू होणार; आठवड्यातून दोनदा होणार विशेष क्लास

Sex Education in Schools: केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील शाळांमध्ये लवकरच लैंगिक शिक्षण सुरू होणार आहे. NCERT द्वारे प्राथमिक स्तरापासून तयार केल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाविषयी सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 14, 2026 | 02:13 PM
sex education

sex education

Follow Us
Follow Us:

Sex Education in Schools: बहुतांश भारतीय आजही सेक्स एज्युकेशन म्हणजेच लैंगिक शिक्षणावर उघडपणे बोलण्यास कचरतात. या विषयाला बंद खोलीतील विषय मानले जाते. परंतु, आता काळानुसार विचार बदलण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, देशभरातील शाळांमध्ये लवकरच लैंगिक शिक्षण सुरू करण्याची तयारी सुरू आहे. सरकारला या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या हिरव्या कंदिलाची प्रतीक्षा आहे. मंजुरी मिळताच देशभरातील शाळांमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल.

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सुनावणीदरम्यान किशोरवयीन मुलांच्या (१६ ते १८ वर्षे वयोगट) परस्पर संमतीने झालेल्या प्रेमसंबंधांवर आणि त्यामध्ये पॉक्सो कायद्याच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली होती. अनेकदा पाहायला मिळते की, किशोरवयीन मुले यामुळे अनेकदा घर सोडून निघून जातात आणि त्यांचे पालक खोट्या प्रतिष्ठेसाठी फौजदारी गुन्हे दाखल करतात. याच समस्येचे निवारण आणि मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळांच्या अभ्यासक्रमात या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा समावेश करण्याची तयारी सुरू आहे.

न्यायालयात सरकारची बाजू आणि पॉक्सो (POCSO) बाबत चिंता

केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर ही बाजू मांडली. न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले की, अनेक प्रकरणांमध्ये १६ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुले परस्पर संमतीने संबंध प्रस्थापित करून घर सोडून जातात. यानंतर त्यांचे पालक खोट्या प्रतिष्ठेपोटी पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करतात. यामुळे मुलांचे भविष्य खराब होते. हीच गंभीर चिंता लक्षात घेऊन सरकारने या समस्येच्या मूळ कारणावर काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

परस्पर संमतीने संबंध ठेवणाऱ्या किशोरवयीन मुलांची गोपनीयता आणि पॉक्सो कायद्यातील गुंतागुंतीच्या प्रकरणांच्या तपासासाठी सरकारने एका विशेष पॅनेलची स्थापना केली होती. महिला व बालविकास मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांच्या नेतृत्वाखालील २६ सदस्यीय पॅनेलने सखोल चर्चेनंतर एक अहवाल तयार केला. या पॅनेलने शिफारस केली आहे की, मुलांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी शाळांच्या अभ्यासक्रमात ‘सर्वसमावेशक लैंगिक शिक्षण’ आणि ‘लैंगिक शोषणापासून संरक्षण’ यांसारख्या गंभीर विषयांचा समावेश केला जावा.

Govt Jobs: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सरकारी नोकरीची संधी! आयटीआय उत्तीर्ण ते इंजिनिअर्स पदांसाठी भरती सुरू; पाहा पात्रता

NCERT तयार करणार अभ्यासक्रम; प्राथमिक स्तरापासून होणार सुरुवात

पॅनेलच्या शिफारशींनुसार, हा नवीन अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी NCERT कडे सोपवली जाईल. ही संपूर्ण योजना नवीन शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) च्या नियमांनुसारच लागू केली जाईल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, हे शिक्षण केवळ मोठ्या मुलांपुरते मर्यादित असणार नाही. प्राथमिक शाळेच्या स्तरापासूनच मुलांना त्यांच्या वयानुसार या गोष्टी शिकवल्या जाव्यात, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे. यासाठी शाळांमध्ये विशेष तज्ज्ञ शिक्षकांची (Expert Teachers) नियुक्ती करण्याचेही सूचवले आहे.

आठवड्यातून दोनदा होणार २० मिनिटांची विशेष तासिका

या पॅनेलने आपल्या अहवालात अत्यंत व्यावहारिक अशा वेळापत्रकाची (टाईम-टेबल) शिफारस केली आहे. त्यानुसार शाळांमध्ये दर आठवड्याला किमान दोनदा लैंगिक शिक्षणाची 20 मिनिटे तासिका निश्चित करण्यात आली आहे. जेणेकरून मुले कोणत्याही मानसिक दडपणाशिवाय सहजपणे शिकू शकतील.

Aadhaar Supervisor Recruitment 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! आधार सुपरवायझर आणि ऑपरेटर पदांची भरती; जाणून घ्या पात्रता

या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलांना ‘गुड टच आणि बॅड टच’ (Good Touch and Bad Touch) समजून देण्यासोबतच वयानुसार शरीरात होणाऱ्या बदलांविषयी जागरूक करणे हा आहे. मुलांना योग्य वयात योग्य माहिती मिळाल्यास ते स्वतःचे लैंगिक शोषणापासून संरक्षण करू शकतील. तसेच, ना समजीतून होणारे कायदेशीर वाद आणि पॉक्सो कायद्याचा गैरवापर टळण्यास मदत होईल.

Web Title: Sex education to be introduced in schools ncert syllabus pocso act supreme court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • education
  • Maharashtra Schools

संबंधित बातम्या

CAT 2026 ची तयारी AI द्वारे कशी करावी? जाणून घ्या अभ्यासाच्या स्मार्ट ट्रिक्स!
1

CAT 2026 ची तयारी AI द्वारे कशी करावी? जाणून घ्या अभ्यासाच्या स्मार्ट ट्रिक्स!

Azim Premji Scholarship 2026 साठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख; पात्र विद्यार्थिनींनी असा करा अर्ज
2

Azim Premji Scholarship 2026 साठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख; पात्र विद्यार्थिनींनी असा करा अर्ज

जिल्हा परिषदेच्या २८३ शाळा क्रीडांगणाविना! क्रीडा विकासाला ब्रेक; अंजनगाव सुर्जीत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव प्रलंबित
3

जिल्हा परिषदेच्या २८३ शाळा क्रीडांगणाविना! क्रीडा विकासाला ब्रेक; अंजनगाव सुर्जीत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव प्रलंबित

Ramon Magsaysay Award 2026: मॅगसेसे पुरस्कार २०२६ विजेत्या रूना खान कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्या समाज कार्याबाबत सविस्तर..
4

Ramon Magsaysay Award 2026: मॅगसेसे पुरस्कार २०२६ विजेत्या रूना खान कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्या समाज कार्याबाबत सविस्तर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.