Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास कुणाला किती माहिती? ‘श्री शिव छत्रपती ज्ञानस्पर्धा’चे आयोजन

विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास व राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्यासाठी खामगाव विश्व हिंदू परिषदेतर्फे ‘श्री शिव छत्रपती ज्ञानस्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 09, 2026 | 02:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास, स्वराज्य स्थापनेची प्रेरणादायी गाथा तसेच राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने खामगाव विश्व हिंदू परिषदेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘श्री शिव छत्रपती ज्ञानस्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. या ज्ञानस्पर्धेसाठी शहरासह परिसरातील शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दरवर्षी सुमारे २ हजार ते ४ हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग नोंदवतात.

Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; ४० जणांना मिळणार शिष्यवृत्ती

या ज्ञानस्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी व अभिमानास्पद इतिहास, स्वराज्य स्थापनेमागील दूरदृष्टी, राजमाता जिजाऊंचे संस्कार व विचार, राज्याभिषेक सोहळा, तसेच स्वराज्यासाठी केलेले त्याग व बलिदान यांची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो. केवळ इतिहासाची ओळख करून देणे एवढाच उद्देश नसून, भावी पिढीने देव, देश व धर्मासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करावे, हा संदेश या ज्ञानस्पर्धेतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येतो.

यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी ही ज्ञानस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ७.०० ते ९.३० या वेळेत नॅशनल हायस्कूल, खामगाव येथील मैदानावर ही स्पर्धा संपन्न होणार आहे. ही स्पर्धा इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील वर्गशिक्षकांकडे १० रुपये परीक्षा शुल्क जमा करून नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांना आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आयोजकांनी सांगितले.

Career in Music: संगीत क्षेत्रात कसे करावे करिअर? अशा प्रकारे बना Music Producer

या ज्ञानस्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन खामगाव विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी तसेच संयोजक नगरनाईक, सहसंयोजक चव्हाण व कुळकर्णी यांनी केले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी राजेंद्रसिंह राजपूत व अमोल जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Shri shiv chhatrapati knowledge competition was organized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji maharaja
  • Washim news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.