
sport
Sports Management Career India: भारतामध्ये क्रिकेटचे वेड हे अनेक लोकांमध्ये दिसून येते. आयपीएल (IPL) सुरू होताच प्रत्येक जण आपल्या आवडत्या खेळाडूंना आणि टीम्सना सपोर्ट करण्यासाठी सज्ज होतो. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की मैदानावर उतरणाऱ्या खेळाडूंव्यतिरिक्त हजारो लोक असेही असतात, जे पडद्यामागे राहून संपूर्ण स्पर्धा यशस्वी करतात? हीच ती दुनिया आहे, जिथे स्पोर्ट्स मॅनेजमेंट मधील व्यावसायिकांची सर्वाधिक गरज भासते. जर तुमचे स्वप्न आयपीएल, प्रो कबड्डी लीग (PKL), इंडियन सुपर लीग (ISL) किंवा इतर कोणत्याही मोठ्या क्रीडा स्पर्धेचा भाग बनण्याचे असेल आणि तुम्ही खेळाडू नसाल, तर हे क्षेत्र तुमच्यासाठी एक उत्तम करिअरचा पर्याय ठरू शकते.
गेल्या काही वर्षांत भारतातील क्रीडा क्षेत्र वेगाने विस्तारले आहे. नवनवीन लीग्स सुरू होणे, स्पॉन्सरशिप मिळणे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रसार झाल्यामुळे खेळ आता केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेला नसून तो अब्जावधी रुपयांचा व्यवसाय बनला आहे. अशा परिस्थितीत, ही संपूर्ण व्यवस्था हाताळण्यासाठी प्रशिक्षित स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रोफेशनल्सची मागणी सातत्याने वाढत आहे.
स्पोर्ट्स मॅनेजमेंट हा असा एक व्यावसायिक कोर्स आहे, ज्यामध्ये बिझनेस मॅनेजमेंट आणि क्रीडा क्षेत्रातील गरजा एकत्र शिकवल्या जातात. या कोर्सदरम्यान विद्यार्थ्यांना एखादी क्रीडा स्पर्धा सुरू करण्यापासून ते तिच्या यशस्वी आयोजनापर्यंत प्रत्येक काम कसे केले जाते, याचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये मार्केटिंग, ब्रँडिंग, स्पॉन्सरशिप, इव्हेंट प्लॅनिंग, तिकिटांची विक्री, मीडिया मॅनेजमेंट, खेळाडूंचे करार (कॉन्ट्रॅक्ट्स), आर्थिक नियोजन (फायनान्स) आणि स्टेडियम ऑपरेशन्स यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली जाते.
AI and Jobs: ‘पुढील १० वर्षे धोक्याची! ऑफिसमधील ‘या’ ५ प्रोफेशन्सच्या नोकऱ्यांवर गदा येणार गदा?
स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर : जर तुम्हाला मोठ्या कार्यक्रमांचे नियोजन करणे आवडत असेल, तर तुम्ही स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर बनू शकता. या पदावर संपूर्ण स्पर्धेचे नियोजन, आयोजन आणि संचालन करण्याची जबाबदारी असते.
ॲथलीट मॅनेजर किंवा स्पोर्ट्स एजंट : ज्या तरुणांना थेट खेळाडूंसोबत काम करण्याची इच्छा आहे, ते स्पोर्ट्स एजंट बनू शकतात. त्यांचे काम खेळाडूंचे कॉन्ट्रॅक्ट्स, जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंट आणि त्यांची मीडिया इमेज सांभाळणे हे असते.
स्पोर्ट्स मार्केटिंग मॅनेजर : मार्केटिंगमध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही भूमिका अत्यंत आकर्षक आहे. यामध्ये विविध कंपन्यांसोबत स्पॉन्सरशिप करार करणे, जाहिरात मोहिमा राबवणे आणि चाहत्यांमध्ये टीम किंवा लीगची लोकप्रियता वाढवण्याचे काम केले जाते.
स्पोर्ट्स डेटा ॲनालिस्ट : डेटा आणि तंत्रज्ञानाची आवड असलेले तरुण यामध्ये आपले करिअर करू शकतात. हे व्यावसायिक खेळाडूंची कामगिरी, प्रतिस्पर्धी संघाची रणनीती आणि सामन्याशी संबंधित आकडेवारीचे विश्लेषण करून टीमला योग्य निर्णय घेण्यास मदत करतात.