
फोटो सौजन्य - Social Media
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. स्टाफ सेलेक्शन कमिशनने (SSC) २०२६-२७ या वर्षासाठीचा नवीन परीक्षा कॅलेंडर जाहीर केला आहे. या कॅलेंडरमध्ये एकूण १२ प्रमुख परीक्षांच्या संभाव्य (टेंटेटिव्ह) तारखा देण्यात आल्या असून, नोटिफिकेशन कधी येणार, अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आणि परीक्षा कोणत्या महिन्यात होणार याची स्पष्ट रूपरेषा उमेदवारांना मिळाली आहे. SSCच्या परीक्षा मे २०२६ पासून सुरू होऊन मार्च २०२७ पर्यंत चालणार आहेत.
दरवर्षी SSCमार्फत ८० हजारांहून अधिक पदांची भरती केली जाते. यामध्ये दहावी पास, बारावी पास तसेच पदवीधर उमेदवारांना संधी मिळते. त्यामुळे SSC कॅलेंडरची प्रतीक्षा उमेदवारांना असते, कारण यामुळे अभ्यासाचे नियोजन करणे अधिक सोपे होते. हे कॅलेंडर ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असून, दिलेल्या तारखा प्रशासनिक कारणांमुळे बदलू शकतात, हेही SSCने स्पष्ट केले आहे.
SSCने जाहीर केलेल्या कॅलेंडरनुसार १२ परीक्षांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. DoPTसाठी होणाऱ्या JSA/LDC, SSA/UDC आणि ASO विभागीय परीक्षांचे नोटिफिकेशन १६ मार्च २०२६ रोजी येणार असून, ७ एप्रिल २०२६ ही अर्जाची अंतिम तारीख असेल. या परीक्षांची लेखी (CBE) परीक्षा मे २०२६ मध्ये होणार आहे.
SSC CGL 2026 परीक्षा मार्च २०२६ मध्ये नोटिफिकेशनसह येणार असून, मे–जून २०२६ दरम्यान टियर-1 परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्याच कालावधीत ज्युनियर इंजिनिअर (JE) 2026 ची परीक्षाही होणार आहे. सेलेक्शन पोस्ट फेज-XIV 2026 परीक्षा मे ते जुलै २०२६ दरम्यान होईल. SSC CHSL 2026 साठी नोटिफिकेशन एप्रिल २०२६ मध्ये, तर परीक्षा जुलै ते सप्टेंबर २०२६ दरम्यान अपेक्षित आहे. स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D तसेच हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा ऑगस्ट–सप्टेंबर २०२६ मध्ये होतील.
दहावी पास उमेदवारांसाठी महत्त्वाची असलेली SSC MTS 2026 परीक्षा सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२६ दरम्यान होणार असून, या परीक्षेसाठी सर्वाधिक अर्ज येतात. SSC CPO (SI) 2026 परीक्षा ऑक्टोबर–नोव्हेंबर २०२६ मध्ये होईल. तर SSC GD कॉन्स्टेबल 2027 परीक्षा जानेवारी ते मार्च २०२७ या कालावधीत घेतली जाणार आहे. उमेदवारांनी ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन For Candidates विभागातील Exam Calendar पर्याय निवडावा. तेथे Tentative Calendar of Examinations for the Year 2026-2027 हा PDF डाउनलोड करता येईल. हा कॅलेंडर उमेदवारांसाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. आता परीक्षा कधी आहे हे माहीत असल्याने अभ्यासाचे नियोजन अधिक प्रभावी करता येईल. नोटिफिकेशन मार्चपासून सुरू होणार असल्याने आतापासूनच तयारीला गती देण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. सर्व अधिकृत अपडेटसाठी ssc.gov.in वरच अवलंबून राहावे, असेही सांगण्यात आले आहे.