फोटो सौजन्य - Social Media
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाने (JSSC) जेल वॉर्डर (कक्षपाल) पदांच्या मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण १७३३ पदे भरली जाणार असून ९ जानेवारी २०२६ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. यापूर्वी अर्ज प्रक्रिया ७ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणार होती; मात्र काही कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. आता इच्छुक उमेदवार ८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही भरती विशेषतः दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महत्त्वाची आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींना या संधीचा लाभ घेता येणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून आयोगाच्या अधिकृत वेबसाइट jssc.jharkhand.gov.in वरून अर्ज करावा लागणार आहे.
या भरतीसाठी शारीरिक पात्रता निकष ठरवण्यात आले आहेत. अनारक्षित/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)/अत्यंत मागास व मागास वर्गातील पुरुष उमेदवारांची किमान उंची १६० सेमी असावी. अनुसूचित जमाती/अनुसूचित जातीतील पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची १५५ सेमी ग्राह्य धरली जाईल. सर्व वर्गातील महिला उमेदवारांसाठी किमान उंची १४८ सेमी असणे आवश्यक आहे.
भरती प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे शारीरिक दक्षता परीक्षा. यामध्ये १६०० मीटर धाव अनिवार्य आहे. पुरुष उमेदवारांना ६ मिनिटांत ही धाव पूर्ण करावी लागेल. महिला उमेदवारांना १० मिनिटांचा वेळ दिला जाईल. यापूर्वी ही धाव १० किमीची होती; मात्र नव्या नियमांनुसार ती १६०० मीटर करण्यात आली आहे. शारीरिक चाचणीत यशस्वी ठरणाऱ्या उमेदवारांनाच पुढील टप्प्यातील लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल.
अर्ज प्रक्रिया कशी कराल?






