Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा जल्लोषात संपन्न ! पहिल्या दोन क्रमांकांच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरीत आयोजित राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा जल्लोषात संपन्र झाली. या स्पर्धेत तब्बल १०७१ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. पहिल्या दोन क्रमांकांच्या विजेत्यांची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी आली आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 13, 2024 | 07:31 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Close
Follow Us:

जमीर खल्फे/ रत्नागिरी:  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी द्वारा आणि रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने राज्यस्तरीय शालेय मैदानी (१४,१७,१९ वर्षा आतील मुली) स्पर्धेचे आयोजन एस.व्हि.जे.सी.टी. क्रीडा संकुल, डेरवण येथे दि. ०९ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये राज्यातील नागपूर, मुंबई, पुणे, लातूर, छ. संभाजी नगर, अमरावती, नाशिक, क्रिडा प्रबोधिनी,कोल्हापूर अशा एकूण ०९ विभागातील ३६ जिल्ह्यांतून अंदाजे १०७१ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी असल्याने उत्तम खेळांचे प्रदर्शन या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना अनुभवता आले आहे.

हे देखील वाचा- सरकारी नोकरी पगार 92 हजार; ITBP मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी संजय सबनीस (उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे),माणिक पाटील (उपसंचालक कोल्हापूर विभाग, कोल्हापूर), जिल्हा क्रिडा अधिकारी  विजय शिंदे, क्रिडा संचालक  श्रीकांत पराडकर, रत्नागिरी जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे  संदिप तावडे, तसेच क्रीडा अधिकारी अक्षय मारकड, गणेश जगताप, राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर, गणेश खैरमोडे, क.लिपिक प्रणित कांबळे व स्पर्धेसाठी उपस्थित निवड समितीमध्ये गणेश जाधव, पूनम नवगिरे, बळवंत बाबर, सिमा पाटील, अविनाश पाटील, पारस पाटील, कय्युम शेख, हर्षल निकम, आदि मान्यवर उपस्थित होते.

आधुनिक सिंथेटिक ट्रॅकचा फायदा घेत कामगिरी उंचवा- संजय सबनीस

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय शिंदे यांनी केले. संजय सबनीस यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक सिंथेटिक ट्रॅकचा फायदा घेऊन सतत आपली कामगिरी उंचावण्याबाबत संबोधित केले. तसेच माणिक पाटील यांनी खेळ आणि त्या संबंधित शासकीय प्रोत्साहनपर योजना याबाबतचे महत्व स्पष्ट करून खेळाडूंना संबोधित केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश खैरमोडे यांनी केले.

हे देखील वाचा- देशातील ‘या’ शहरांमध्ये मिळतो सर्वाधिक पगार; कामासहित मोठी आर्थिक संधी

पहिल्या दोन क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

स्पर्धेतील विजयी खेळाडूंना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक इव्हेंट मधील प्रविण्यप्राप्त पहिल्या दोन क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील अनुभवी खेळाडूंनी यश संपादन केलेच मात्र  नवनवीन उद्योन्मुख खेळाडूही राज्याला मिळाले आहेत. शालेय स्तरावरील या गुणवत्तेला योग्य दिशा दिल्यास हेच खेळाडू राज्यासाठी आणि देशासाठी गौरवास्पद कामगिरी करतील असे मत प्रशिक्षकांनी व्यक्त केले. एस.व्हि.जे.सी.टी. क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक ट्रॅकचा फायदा आमच्या खेळाडूंची कामगिरी उंचावण्यास कारणीभूत ठरल्याचेही प्रशिक्षकांनी सांगितले.  एस.व्हि.जे.सी.टी. क्रीडा संकुला मध्येच खेळाडूंची उत्तम निवास भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेबाबत आम्ही निर्धास्त होतो, असेही पालकांनी आवर्जून सांगितले.

Web Title: State level school outdoor sports competition concluded in ratnagiri with jubilation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2024 | 07:31 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

महाराष्ट्र आणि जमर्नीतील ‘या’ राज्यामध्ये करार! परदेशात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
1

महाराष्ट्र आणि जमर्नीतील ‘या’ राज्यामध्ये करार! परदेशात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

पुण्यात अभ्यासिकांसाठी नियंत्रण नियमावली हाेणार; नेमकं काय करणार उपाययाेजना?
2

पुण्यात अभ्यासिकांसाठी नियंत्रण नियमावली हाेणार; नेमकं काय करणार उपाययाेजना?

IMD Weather Update : हुडहुडी! ऐन थंडीत पावसाचा कहर, ‘या’ तीन दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा
3

IMD Weather Update : हुडहुडी! ऐन थंडीत पावसाचा कहर, ‘या’ तीन दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा

CM Devendra Fadnavis: फडणवीस सरकारची ऐतिहासिक कामगिरी, एका महिन्यात ४५,९११ सौर पंप लावून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद
4

CM Devendra Fadnavis: फडणवीस सरकारची ऐतिहासिक कामगिरी, एका महिन्यात ४५,९११ सौर पंप लावून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.