Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर मध्यरात्री गॅस गळती, 24 जणांना त्रास; नागरिकांची मोठी धावपळ

मार्केटयार्डातील गंगाधाम-बिबवेवाडी रस्त्यावरील एका रासायनिक कंपनीच्या सिलेंडरमधून क्लोरीन हा गॅस गळती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 01, 2026 | 04:07 PM
पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर मध्यरात्री गॅस गळती, 24 जणांना त्रास; नागरिकांची मोठी धावपळ

पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर मध्यरात्री गॅस गळती, 24 जणांना त्रास; नागरिकांची मोठी धावपळ

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील मार्केटयार्डातील गंगाधाम-बिबवेवाडी रस्त्यावरील एका रासायनिक कंपनीच्या सिलेंडरमधून क्लोरीन हा गॅस गळती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गॅस गळतीमुळे भागातील तब्बल २४ नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. सुदैवाने नागरिकांच्या जिवावर हा प्रकार बेतला नाही. मात्र, गॅस गळतीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागला. यामध्ये अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्यासह जवान देखील जखमी झाले.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन गॅस गळती रोखल्याने मोठा अनर्थ देखील टळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी जागा मालक व मॅनेजरवर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गॅस गळती प्रकरणी जागा मालक प्रकाश बाबुराव मुथा आणि मॅनेजर साहिल हमीद मुलानी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २८६, १२५, १२५(अ) आणि प्रदूषण कायदा कलम ७, ८, १५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्पाक सय्यद (वय ३०) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकाश मुथा यांची गंगाधाम बिबवेवाडी रस्त्यावरील वर्धमान लॉन्सच्या समोर मोकळी जागा आहे. ही मोकळी जागा प्रकाश मुथा यांची असून, त्याठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये पुणे महापालिकेला पुरविण्यात येणारा क्लोरीन या गॅसची कंपनी आहे. कंपनीचे काही मोठे सिलेंडर मोकळ्या जागेत ठेवण्यात आले होते. क्लोरीन गॅस पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो.

दरम्यान, मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास एका टाकीमधून क्लोरीन गॅस लिकेज झाला. टाकीत विषारी वायू तयार होऊन हा क्लोरीन गॅस गळती झाला. त्यामुळे काही वेळातच परिसरातील नागरिक व रहिवाशांना त्याचा त्रास होण्यास सुरूवात झाली. ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना श्वास घेण्यास प्रचंड वेदना होऊ लागल्या. तेव्हा हा प्रकार समोर आला. लागलीच याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. तोपर्यंत या गॅसमुळे तब्बल २४ नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. काहींना ससून रुग्णालय तर काहींना कात्रजमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. यामध्ये ८ महिला, ६ मुले तसेच ५ पुरूषांचा समावेश आहे. यामुळे गॅस गळतीमुळे या भागात नागरिकांना त्रास सोसावा लागला. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.

गॅस गळतीमुळे नागरिकांचे डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास जाणवल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना याचा प्रचंड त्रास झाला. सुरूवातीलाच ज्येष्ठांना त्रास जाणवू लागला. याठिकाणी मोठ्या गॅसच्या टाक्या आहेत. एका टाकीतून हा गॅस गळती झाला होता. दिवसभर तीव्र उन्ह सुरू आहे. त्यामुळे विषारी वायू होऊन तो गळती झाला असावा असा अंदाज आहे.

अग्शिशमन दलाच्या जवानांनी सुरक्षाविषयक उपकरणे परिधान (बीए सेट) करुन आधिकारी आणि जवान कंपनीत शिरले. त्यांनी तातडीने गॅस गळती रोखली. नागरिकांना त्रास जाणवू लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवानांनी तातडीने नागरिकांना ससून रुग्णालयात रुग्णवाहिकेतून दाखल केले होते. तेव्हा हा गॅस बंद करत असताना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यासह जवानाला देखील त्रास झाला. अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच अधिकारी आणि ३० जवान मदतकार्यात सहभागी झाले होते.

हे सुद्धा वाचा : उष्णतेच्या लाटेमुळे दूध उत्पादनात मोठी घट; जिल्हा प्रशासनाकडून पशुपालकांसाठी नियमावली जाहीर

Web Title: Citizens are suffering due to gas leakage on gangadham road in pune at midnight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • gas leak
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Shrikant Shinde: Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी
1

Shrikant Shinde: Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी

SIR Voter List: SIRमध्ये मोठी तफावत! तब्बल ४.६४ लाख मतदारांचा पत्ता नाही! ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी होणार जाहीर
2

SIR Voter List: SIRमध्ये मोठी तफावत! तब्बल ४.६४ लाख मतदारांचा पत्ता नाही! ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी होणार जाहीर

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय
3

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार
4

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.